• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • ‘बसपन’ का प्यार कभी भूल नही जाना रे, चिमुरड्याच्या ‘लव्ह सॉंग’ला मिळतायत लाखो हिट्स, पाहा Video

‘बसपन’ का प्यार कभी भूल नही जाना रे, चिमुरड्याच्या ‘लव्ह सॉंग’ला मिळतायत लाखो हिट्स, पाहा Video

शाळकरी वयातला एक मुलगा शाळेतील शिक्षकांसमोर उभा राहून गात असलेल्या प्रेमगीताचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

 • Share this:
  मुंबई, 13 जुलै : सध्या कुठला व्हिडिओ (Video) कधी व्हायरल (Viral) होईल, याचा काही नेम नाही. शाळकरी वयातला एक मुलगा शाळेतील शिक्षकांसमोर उभा राहून गात असलेल्या प्रेमगीताचा व्हिडिओ (Video of love song) सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. निळ्या रंगाचा शर्ट घातलेला हा मुलगा समोर उभा राहतो आणि थेट गाणं म्हणायला सुरुवात करतो. त्याच्या पाठिमागे बसलेले शिक्षकवृंदही (Teachers) त्याला प्रतिसाद देतात, असं या व्हिडिओत दिसतं. ‘बसपन का प्यार कभी भूल नही जाना रे’, या ओळी तो गात जातो आणि समेवर आल्यावर शिक्षकदेखील त्याच्या सुरात सूर मिसळतात. हा मुलगा इतका छोटा आहे की त्याला अजून शब्दांचे अर्थदेखील माहित असण्याची शक्यता नाही. बचपन या शब्दाऐवजी बसपन असा शब्द उच्चारतो. मात्र हाच शब्द सध्या इन्ट्राग्रामवर ट्रेंडिंग झाला असून बसपन का प्यार (Baspan Ka Pyar) सध्या सोशल मीडियावर जोरदार ट्रेंडिंग असल्याचं चित्र आहे. बसपन का प्यारवरून आता अनेक मीम्सदेखील यायला सुरुवात झाली असून अनेकांनी या विषयावर गरमागरम चर्चा आणि जुन्या आठवणी टाकायला सुरुवात केली आहे.
  View this post on Instagram

  A post shared by PATNA in HD (@patnahd)

  शाळकरी वयातलं आपलं प्रेम हा सर्वांच्याच आवडीचा विषय असतो. मनाच्या एका कोपऱ्यात साठवून ठेवलेल्या अशा काही आठवणींना उजाळा मिळणं किंवा पुन्हा एकदा त्या काळातल्या आठवणींमध्ये रमण्याचं निमित्त मिळणं, हे सामान्यांना नेहमीच आवडतं. या मुलाचा व्हिडिओ व्हायरल होण्यामागे कदाचित हे कारणदेखील असेल, असा अंदाज व्यक्त होतो आहे. हे वाा - बापरे बाप! धावत्या कारच्या काचेवर आला साप, 2 तास तसाच केला प्रवास, VIDEO काहीही असो, या मुलानं चार ओळी काय गायल्या, नेटिझन्सना चर्चेसाठी एक विषय मिळाला. हा मुलगा नेमक्या कुठल्या भागातील आहे आणि कुठल्या शाळेत हा व्हिडिओ रेकॉर्ड झाला आहे, याचे तपशील अजून मिळालेले नाहीत.
  Published by:desk news
  First published: