नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर : लॉटरी हे झटपट आणि भरपूर पैसे मिळवण्याचं साधन आहे; मात्र ते बेभरवशी असल्याने त्यावर कोणी अवलंबून राहत नाही. ज्यांना लॉटरी लागते, त्यांचं आयुष्य मात्र लॉटरीमुळे पार बदलून जातं. जर्मनीतल्या डॉर्टमुंडमध्ये राहणाऱ्या कुर्सत यिल्दिरिम या 41 वर्षांच्या व्यक्तीला 24 सप्टेंबरला एक लॉटरी लागली. या लॉटरीतून त्याला 9,927,511,60 युरो म्हणजेच जवळपास 81 कोटी रुपये मिळाले. आता त्याला लग्न करायचं आहे. त्यासाठी तो वधूचा शोधही घेतो आहे. त्याकरिता भरपूर पैसे करण्याचीही त्याची तयारी आहे. ‘झी न्यूज हिंदी’ने त्याबाबतचं वृत्त दिलं आहे.
जर्मनीतल्या कुर्सत यिल्दिरिम या कामगाराला 24 सप्टेंबर रोजी एक लॉटरी लागली. यात त्याला 81 कोटी रुपये मिळाले आहेत. त्यानंतर त्यानं स्टील कंपनीतली त्याची नोकरी सोडून दिली व 3.6 कोटी रुपयांना फेरारी 448 पिस्टा ही गाडी खरेदी केली. त्याशिवाय 2 कोटी रुपयांची पोर्शे टर्बो एस. कॅब्रियोलेटही घेतली. त्यानंतर त्यानं त्याच्या आवडीची दारू व एक महागडं घड्याळ घेतलं. आता त्याला लग्न करायचं आहे. मिळालेल्या पैशांचा आनंद उपभोगण्यासाठी त्याला जोडीदार हवा आहे.
हे ही वाचा : डान्स करताना चिमुकलीसोबत असं काही घडलं की पाहून येईल हसू
“मी अजून अविवाहित आहे. माझी भावी पत्नी गोरी असेल किंवा सावळी असेल, तरी त्याची मला पर्वा नाही; मात्र मला प्रेमात पडण्याची इच्छा आहे. माझ्या भावी पत्नीला फिरण्याची आवड असायला हवी. तिला माझ्यासोबत कुटुंब तयार करायला आवडलं पाहिजे. काहीही झालं, तरी तिच्यावर मी विश्वास ठेवू शकतो अशी जोडीदार मला हवी आहे,” असं त्यानं बिल्ड या जर्मन वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं. त्याला त्याच्या जोडीदाराचा शोध घेण्यासाठी एका जर्मन टॅब्लॉइडनं एक ई-मेल अकाउंट तयार करून दिलं आहे.
लॉटरीची मोठी रक्कम जिंकल्यानंतर त्यानं त्याचा अनुभव सांगितला. या पैशांची आपण व्यवस्थित काळजी घेऊ शकतो व तशी व्यवस्थाही आपण केल्याचं त्यानं म्हटलं आहे. ‘ज्यांच्याशी गेल्या अनेक वर्षांमध्ये काहीही संपर्क नाही, तेही आता पैशाच्या लोभानं माझ्या जवळ येत आहेत. इतके पैसे कमावण्यासाठी मी लायक नाही असंही काही जणांना वाटत आहे,’ असं त्यानं म्हटलं आहे.
हे ही वाचा : अरे बापरे! दारूच्या नशेत माशांऐवजी महाकाय अजगराला धरलं आणि पुढे भयंकर घडलं; Watch Video
अचानक इतकी मोठी रक्कम मिळाल्यावर माणसाचे पाय जमिनीवरून सुटतात. त्याबाबत कुर्सतचं म्हणणं आहे, की ‘मी कुठून आलो आहे, हे मी कधीच विसरणार नाही. मी कामगार वर्गातून आलो आहे. मला कधीही गर्व होणार नाही, याची मी काळजी घेईन.’ त्याने घेतलेल्या महागड्या गाड्यांबाबतही त्याचं म्हणणं आहे, की ‘त्या गाड्या माझ्यावर जळणाऱ्यांसाठी मी घेतल्या आहेत.’
आपल्याला मिळालेल्या पैशांचा उपयोग सामाजिक कामासाठी करावा असंही त्याला वाटत आहे. त्यानं काही पैसे भाऊ व आई-वडिलांना पाठवले आहेत. आफ्रिकेत विहिरी खोदण्यासाठी व मुलांना भेटवस्तू देण्यासाठी जाण्याची त्याची इच्छा आहे. लॉटरीतून मिळालेल्या पैशांमुळे त्याचं आयुष्यच बदलून गेलं आहे.