वॉशिंग्टन, 14 मे : सध्या जगभर कोरोना व्हायरसनं धुमाकूळ घातला आहे. जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन आहे. याकाळात लोक घरातच असल्यानं स्वच्छता करण्याकडे लोकांचा कल आहे. अमेरिकेत अशीच घराची साफ सफाई करत असताना मिखाइल पेट्रिक यांना फ्रिजमध्ये 25 वर्षांपूर्वीची पेस्ट्री सापडली. इतक्या वर्षानंतर सापडलेली ही पेस्ट्री त्यांनी खाऊन पाहिली आणि त्याची चव चांगली होती असंही त्यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. एआरवाय न्यूजने म्हटलं की, सोशल मीडियावर अमेरिकन नागरिक मिखाइल पेट्रिकने एक ट्विट केलं आहे. त्यात म्हटलं की, लॉकडाऊनच्या अनेक फायद्यामधील एक फायदा असा होता की आईने फ्रीज पूर्ण साफ केला. यावेळी फ्रीजमध्ये एक पेस्ट्रीचं पाकिट सापडलं. यावर एक्स्पायरी डेट 1995 आहे. मिखाइल म्हणतो की, एप्रिल 1995 आणि 1997 मध्ये जन्माला आलेल्या भावांपेक्षा त्या पेस्ट्रीला जास्त वर्षे झाली आहेत.
One of the advantages of the lockdown is that the mother is finally getting to the bottom of her giant chest freezer.
— Michael Patrick (@micktheejit) May 9, 2020
Behold: 25 year old puff pastry. pic.twitter.com/lyIArR7d0V
मिखाइलनं आणखी एका ट्विटमध्ये म्हटलं की, अजुनही पेस्ट्री खाण्यायोग्य असल्याचं आईने म्हटलं. एक मिठाई म्हणून ती वापरता येईल. पेस्ट्री सापडल्यानंतर त्याची मिठाई तयार केली आणि ती सर्वांनी खाल्ली. पेस्ट्री ज्या फ्रीजमध्ये ठेवण्यात आली होती तो 30 वर्षांपूर्वीचा आहे. मिखाइलच्या या ट्विटरव हजारो लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं म्हटलं की या पेस्ट्रीनं इतिहासातले बदलही पाहिले आहेत. हे वाचा : मोलकरणीला KISS करून केलं हैराण, शिल्पा शेट्टीने पतीची केली धुलाई; VIDEO VIRAL