लातूर, 23 जानेवारी: लातूर (latur) शहारातील विशाल नगर परिसरात एका महाविद्यालयीन तरुणावर कोयत्याने सपासप वार (Attack on college student with scythe)केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लातूर शहरातील अत्यंत गजबजलेल्या आणि रहदारीचा भाग असलेल्या विशाल नगर परिसरात काही अज्ञात मारेकऱ्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर कोयत्याने वार करत त्याला रक्ताच्या थारोळ्यात पाडलं आहे. आज दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा माहिती मिळताच अवघ्या काही मिनिटातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
यावेळी परिसरातील अनेक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. भरदिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी गंभीररित्या जखमी झालेल्या तरुणाला स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. राहुल सुरेश उजळंबे असं हल्ला झालेल्या तरुणाचं नाव असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
हेही वाचा-न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 10वर्षे रेप; तरुणीची कहाणी वाचून बसेल धक्का
संबंधित तरुणावर कोणी आणि कोणत्या कारणातून हा हल्ला केला आहे. याची कोणतीही माहिती अद्याप पोलिसांना मिळाली नाही. पोलिसांनी घटनेची दखल घेतली असून मारेकऱ्यांचा शोध घेतला जात आहे. हा हल्ला झाल्यानंतर घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल नगर परिसरातील साई मंदिरा शेजारील चौकात हा हल्ला झाला आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा-60 वर्षीय वृद्ध महिलेला घरातून बाहेर ओढले, दगडाने ठेचून केला खून, बीडमधील घटना
दुसऱ्या एका घटनेत, काल बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात एका 60 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. आरोपी तरुणाने संबंधित महिलेला घरातून बाहेर ओढून तिचं दगडाने डोकं ठेचलं आहे. हा हल्ला इतका भयंकर होता, की संबंधित महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. हत्या करणारा आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून मृत महिलेचा पुतण्या आहे. हत्या केल्यानंतर नराधम आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.