जाहिरात
मराठी बातम्या / Viral / चालताना रस्त्यावर पडला चिमुकला; मग उठून केला इतका जबरदस्त डान्स की सगळे बघत राहिले, VIDEO

चालताना रस्त्यावर पडला चिमुकला; मग उठून केला इतका जबरदस्त डान्स की सगळे बघत राहिले, VIDEO

चिमुकल्याचा जबरदस्त डान्स

चिमुकल्याचा जबरदस्त डान्स

व्हिडिओमध्ये दिसतं, की मुलगा रस्त्यावर चालताना अचानक खाली पडतो. इतक्यात हा मुलगा अगदी स्टाईलमध्ये पुन्हा उभा राहातो आणि डान्स करू लागतो.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 05 जुलै : सोशल मीडियावर सतत नवनवे व्हिडिओ व्हायरल होत राहतात. यातील काही व्हिडिओ भावुक करणारे असतात, काही खळखळून हसवणारे तर काही चकित करणारे. मात्र यातील काही व्हिडिओ इतके खास असतात, की ते अपलोड होताच मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. सध्या असाच एका चिमुकल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याचा अनोखा डान्स पाहायला मिळतो. व्हायरल झालेल्या या व्हिडिओ मध्ये एक लहान मुलगा जबरदस्त अंदाजात डान्स करताना दिसत आहे. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की लहान मुलं इतका जबरदस्त डान्स करतात की सगळेच त्यांचा परफॉर्मन्स पाहून टाळ्या वाजवू लागतात. आता समोर आलेला व्हिडिओ पाहूनही तुम्ही या मुलाचं कौतुक केल्य़ाशिवाय राहणार नाही.

जाहिरात

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक मुलगा आपल्या डान्स स्टेप्सने लोकांची मनं जिंकत आहे. व्हिडिओमध्ये दिसतं, की मुलगा रस्त्यावर चालताना अचानक खाली पडतो. तिथे उपस्थित असलेल्या लोकांना असं वाटतं की तो पाय अडखळून खाली पडला आहे. इतक्यात हा मुलगा अगदी स्टाईलमध्ये पुन्हा उभा राहातो आणि डान्स करू लागतो. हा मुलगा उभा राहून मार्शल आर्ट्स स्टेपमध्ये डान्स करू लागतो. हे पाहून आसपास उभा असलेले लोकही थक्क झाले. यानंतर तो अनोख्या अंदाजात आपलं शरीर मूव्ह करतो. हे पाहून तुम्हालाही तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही की एवढ्या लहान वयात एखादा मुलगा असा डान्स करू शकतो. या मुलाचा डान्स पाहून आसपासचे लोक एकत्र आले आणि त्याचा व्हिडिओ बनवू लागले. सोशल मीडियावर या डान्स व्हिडिओला भरपूर पसंती मिळताना दिसत आहे. हा डान्स व्हिडिओ आतापर्यंत 4.5 लाखाहून अधिकांनी लाईक केला आहे. यावर लोक निरनिराळ्या कमेंटही करत आहेत. एका यूजरने लिहिलं, की भविष्यातील ब्रूसली भविष्यासाठी सराव करत आहे. काहींनी कमेंट करून या मुलाचं वय विचारलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात