जाहिरात
मराठी बातम्या / Viral / सिंहाचा हरणावर जबरदस्त हल्ला, असं अडकवलं जाळ्यात, Video व्हायरल

सिंहाचा हरणावर जबरदस्त हल्ला, असं अडकवलं जाळ्यात, Video व्हायरल

सिंहाचा हरणावर हल्ला

सिंहाचा हरणावर हल्ला

जंगलातील भयानक प्राण्यांपैकी सिंह एक आहे. शिकारीच्या बाबतीत तर सिंह खूपच तत्पर आणि धोकादायक आहे. तो त्याची शिकार सहजासहजी सोडत नाही.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 25 एप्रिल : जंगलातील भयानक प्राण्यांपैकी सिंह एक आहे. शिकारीच्या बाबतीत तर सिंह खूपच तत्पर आणि धोकादायक आहे. तो त्याची शिकार सहजासहजी सोडत नाही. त्यामुळे अनेकांच्या मनात त्याच्याविषयी दहशत आहे. एकदा का प्राणी त्यांच्या तावडीत आला की त्यातून सुटणे अवघडच नाही तर अशक्यही होते. सिंहाच्या हल्ल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता एक नवीन व्हिडिओ आला आहे, ज्यामध्ये सिंह चतुराईने हरणाची शिकार करत आहे. सिंहाच्या शिकारीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जंगलात हरीण पळत चाललं होतं. तिथे आजूबाजूला सिंह शिकारीसाठी लपून बसलेले होते. जसं हरिण जवळ येतं तसा सिंह त्याच्यावर हल्ला चढवतो. हरीण आपला जीव वाचवण्यासाठी तेथून जीवाच्या आकंताने पळण्याचा प्रयत्न करतो मात्र शेवटी सिंह त्याला खाली पाडतो आणि मग बाकीचे सिंहही तिथे येतात आणि हरणाची पकडून ठेवतात.

Youtube वर व्हायरल होत असलेला हा अप्रतिम व्हिडिओ लेटेस्ट Sightings अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत तो 11 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. एक हजाराहून अधिक लोकांनी त्याला लाइक केले आहे. व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया येत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान, हा व्हिडीओ आफ्रिकेतील सवाना जंगलातील असल्याचं सांगितलं जात आहे. आफ्रिकेतील सवाना जंगलात उग्र सिंहांची संख्या चांगली आहे. येथे राहणारे सिंह प्रामुख्याने झेब्रा आणि वाइल्डबीस्ट सारखे 45 ते 453 किलो वजनाचे मोठे प्राणी खातात. जेव्हा अन्नाची कमतरता असते तेव्हा ते साप देखील खातात आणि लहान प्राण्यांची शिकार करतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात