मुंबई, 20 ऑगस्ट : तुम्हाला माकड आणि मांजराची गोष्ट माहितीच असेल, ज्यात दोन मांजरांच्या लढाईत मांजरीचा फायदा होतो. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ असा बोध आपल्याला या गोष्टीतीन मिळतो. असंच प्रत्यक्षात घडलं आहे. सिंहांच्या भांडणात एका म्हशीचा फायदा झाला आहे. सिंहांच्या भांडणामुळे तिचा जीव वाचला आहे. सिंहांनी मिळून शिकार करूनही त्यांना म्हशीने ठेंगा दाखवला आहे. सिंहांनी मिळून एका म्हशीची शिकार केली, त्यावर ते तुटून पडले. पण एका म्हशीसाठी या सर्व सिंहांमध्ये जुंपली आणि या भांडणात म्हशीने संधी साधून तिथं पळ काढला. व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला सिंहांचा कळप दिसतो आहे आणि जमिनीवर एक म्हैस पडलेली दिसते आहे. सुरुवातीला पाहताच म्हशीला सिंहांनी मारून टाकलं आहे असंच वाटतं. कारण तिच्या शरीराची काही हालचाल होताताना दिसत नाही. सिंहांचा कळप त्या म्हशीवर तुटून पडला आहे. सर्वबाजूंनी सिंहांनी तिला घेरलं आहे. सर्वजण तिला खाण्याच्या तयारीतच आहेत इतक्यात… हे वाचा - OMG! भुकेल्या सापाने दुसऱ्या सापाला जिवंत गिळलं पण…; शेवटी जे घडलं ते आणखी धक्कादायक; Watch Video अचानक दोन बछडे आपसात भांडू लागतात. त्यांना सोडवण्याच्या प्रयत्नात सर्वच सिंहांची आपसात जुंपते. काही वेळापूर्वी एकत्र म्हशीवर तुटून पडलेले सिंह एकमेकांवर तुटून पडतात. एक सिंह त्या म्हशीजवळ उभा असतो. तेव्हा म्हैस थोडी हलताना दिसते. सिंह लगेच त्या म्हशीच्या मानेवर हात ठेवतो.पण सिंहांचं भांडण इतकं वाढतं की म्हशीजवळ असलेला सिंह शेवटी त्यांच्यात मध्यस्थी करायला जातो.
आता म्हशीजवळ कोणीच नसतं. भांडणाऱ्या सिंहांपैकीही कुणाचंच लक्ष तिच्याकडे नसते. या संधीचा ती फायदा घेते. आधी अगदी मृत झाल्याचं नाटक करणारी ही म्हैस काही वेळाच स्वतःच्या पायावर उठून उभी राहते आणि तिथून चालू लागते. तिला थोड्या जखमा झालेल्या दिसत आहेत पण तरी लंगडत लंगडत ती तिथून पळ काढताना दिसते. आश्चर्य म्हणचे सिंहही भांडत भांडत तिथून निघून जातात. भांडणात ते म्हशीला पूर्णपणे विसरतात. हे वाचा - VIDEO - शिकार करणाऱ्या खतरनाक मगरीलाच चावला झेब्रा; काही मिनिटांतच खेळ खल्लास OddIy Terrifying ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. म्हशीच्या हुशारीचं सर्वांनी कौतुक केलं आहे. तर जंगलाचा राजा सिंहाच्या मूर्खपणाचं हसू आलं आहे. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊ नक्की सांगा.