मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO - शिकार करणाऱ्या खतरनाक मगरीलाच चावला झेब्रा; काही मिनिटांतच खेळ खल्लास

VIDEO - शिकार करणाऱ्या खतरनाक मगरीलाच चावला झेब्रा; काही मिनिटांतच खेळ खल्लास

शिकार करायला आलेल्या मगरीशी झेब्र्याने दिली खतरनाक झुंज.

शिकार करायला आलेल्या मगरीशी झेब्र्याने दिली खतरनाक झुंज.

पाण्यातच झेब्राने शिकार करायला आलेल्या मगरीला दिली जबरदस्त फाइट.

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 18 ऑगस्ट : मगरीच्या तावडीतून सिंह, बिबट्या असे खतरनाक प्राणीही सुटत नाहीत. एकदा का मगरीच्या जबड्यात कुणी आलं की त्याची सुटका अशक्यच. पण इतर प्राण्यांसारख्या शक्तिशाली नसलेल्या साध्या झेब्राने मात्र या खतरनाक मगरीशी जबरदस्त फाइट दिली आहे. पाण्यातच मगरीशी झेब्राने लढा दिला आहे. शिकार करायला आलेल्या मगरीवर चांगलाच पलटवार केला आहे. मगर आणि झेब्राच्या फायटिंगचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.  Maasai Sightings युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत पाहू शकता झेब्र्यांचा कळप नदी पार करताना दिसतो आहे. ज्या नदीत हे झेब्रा उतरलेत तिथं आधीच खतरनाक मगरी दबा धरून बसल्या आहेत. जसे झेब्रा नदीच्या पाण्यात उतरतात तशा मगरी त्यांची शिकार करायला येतात. हे वाचा - VIDEO - अवाढव्य अजगराला चावत राहिली, ओरबडत राहिली; पिल्लाला वाचवण्यासाठी आईने धडपड केली शेवटी... एक मगर एका झेब्र्याचा पाय आपल्या जबड्यात धरते. झेब्रा मगरीला लाथेने उडवतो. तिने आपला पाय सोडावा म्हणून तिच्यावर लाथा मारतो. कसंबसं करून तो त्या मगरीच्या तावडीतून सुटतो. त्याचवेळी आणखी एक दुसरी मगर झेब्राच्या दिशेने येते. झेब्रा थोडा पुढे जातो पण मगरीच्या हल्ल्यात तो जखमी झालेला आहे त्यामुळे त्याला फार वेगाने पळता येत नाही. त्याच्या पाठीकडील बाजू मगरीने चावून फाडल्याचंही दिसतं आहे. पण झेब्राही हार मानत नाही. जखमी झाला तरी तोसुद्धा खतरनाक मगरीशी लढा देतो. जशी मगर झेब्राला जबड्यात घेण्याचा प्रयत्न करते तसाच झेब्राही मगरीला चावण्याचा प्रयत्न करतो. मगरीच्या मानेला तो चावा घेतो. त्यावेळी मगरीलाही इतक्या वेदना होतात की ती ओरडताना दिसते. पण मगर सहजासहजी झेब्राच्या तावडीत येत नाही आणि तिच्या तावडीतून सुटणाऱ्या झेब्राचाही ती पाठलाग सोडत नाही. हे वाचा - OMG! सरपटणारा सापही चालू लागला; विश्वास बसत नाही तर पाहा हा VIDEO झेब्राने मगरीपासून वाचवण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला. व्हिडीओच्या शेवटी कोण जिंकलं ते दिसत नाही. पण झेब्राची अवस्था पाहता नक्कीच तो मगरीचा शिकार झालेला असावा. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटलं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.
First published:

Tags: Crocodile, Viral, Viral videos, Wild animal

पुढील बातम्या