मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO - मांस खाणारे सिंह चक्क खाऊ लागले फळ; रसरशीत, लालबुंद कलिंगडावर मारला चांगलाच ताव

VIDEO - मांस खाणारे सिंह चक्क खाऊ लागले फळ; रसरशीत, लालबुंद कलिंगडावर मारला चांगलाच ताव

हिंस्र, आक्रमक मांसाहारी सिंह चक्क गोड कलिंगडाचा आस्वाद घेताना दिसले.

हिंस्र, आक्रमक मांसाहारी सिंह चक्क गोड कलिंगडाचा आस्वाद घेताना दिसले.

हिंस्र, आक्रमक मांसाहारी सिंह चक्क गोड कलिंगडाचा आस्वाद घेताना दिसले.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 05 ऑगस्ट : सिंह (Lion) म्हटले की ते मांस खाण्यासाठी आसुसलेले असतात. भुकेला सिंह (Lion video) एखादा प्राणी दिसला की त्याच्यावर तुटून पडतो. त्याचा फडशा पाडतो. असे मांस खाणारे सिंह फळ (Lion eating fruit) खातात असं सांगितलं तर साहजिक आश्चर्य वाटेल. पण मांस खाणारे सिंह चक्क फळ (Lion eating watermelon) खाताना दिसले आहेत. या सिंहांचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे.

आपल्यासमोर रसरशीत, लालबुंद कलिंगड असेल तर साहजिकच ते खाण्यापासून आपण स्वतःला रोखू शकत नाही. सिंहांच्या बाबतीतही असंच झालं. त्यांना असं कलिंगड दिसलं आणि त्यांना ते खाण्याचा मोह आवरला नाही. मग काय मांसाहारी सिंहांनीसुद्धा कलिंगडावर चांगलाच ताव मारला.

जंगली प्राणी कलिंगड खात असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. Oregon Zoo ट्विटरवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

हे वाचा - Shocking! तरुणीचं भलतंच डेअरिंग, चक्क सापालाच केलं किस; Video पाहूनच हादराल

या व्हिडीओत सिंह, अस्वल, हत्ती हे प्राणी कलिंगड खाताना दिसत आहेत. हा व्हिडीओ  जो पाहून तुम्ही हैराणच व्हाल. एरवी एकमेकांची शिकार करताना दिसणारे हिंस्र, मांसाहारी प्राणीसुद्धा अगदी हौसेने गोड गोड कलिंगडाचा आस्वाद घेत आहेत. त्याची अगदी शांतपणे चव चाखत आहेत. हे दृश्य पाहून वेगळाच आनंद होतो. जितकं या प्राण्यांना हुशारीने शिकार करताना पाहताना धडधड वाढते तितक्याच प्रमाणात त्यांना असं काहीतरी खाताना पाहून मनाला एक वेगळंच समाधान वाटतं आहे.

हे वाचा - OMG! चक्क मांजराने बनवलं ऑमलेट; विश्वास बसत नाही तर पाहा Cat chef चा Video

एरवी पाहताच भीती वाटणारे हे हिंस्र प्राणीही अगदी कुत्रा, मांजर या पाळीव प्राण्यांप्रमाणे क्युट वाटत आहेत, नाही का?

First published:

Tags: Fruit, Viral, Viral videos, Wild animal