दरवाजा उघडला आणि समोर 2 सिंह; माणसाला पाहताच त्यांनी... थरकाप उडवणारा VIDEO

दरवाजा उघडला आणि समोर 2 सिंह; माणसाला पाहताच त्यांनी... थरकाप उडवणारा VIDEO

सकाळी उठताच त्याला सूर्यदेवाऐवजी सिंहांचंच दर्शन घडलं.

  • Share this:

अहमदाबाद, 02 एप्रिल : सकाळी सकाळी दरवाजा उघडल्यानंतर सूर्यदेवाचं दर्शन होतं. पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकायला येतो. असं वातावरण पाहून मन कसं अगदी प्रसन्न होतं. पण दार उघडताच सकाळ सकाळ जर सूर्यदेवाऐवजी जंगलाच्या राजाचंच दर्शन झालं तर. सकाळचं प्रसन्न वातावरण भीतीत बदलून जाईल आणि सकाळच्या थंड वातावरणातही अंगाला दरदरून घाम फुटेल. असंच काहीसं झालं ते गुजरातमधील (Gujarat) एका व्यक्तीसोबत.

गुजरातमधील ही व्यक्ती सकाळी उठली आणि तिनं दरवाजा उघडला. पाहतो तर काय घरासमोर चक्क दोन सिंह. हे सिंह त्याच्या घरासमोरील विहिरीवर छान बसले होते आणि पाणी पित होते. (Man Found Lions Outside Home Drinking Water From The Well).

साहजिकच सिंहांना पाहून कुणाचाही अवस्था व्हावी तशीच अवस्था या व्यक्तीची झाली.

हे वाचा - माणसालाही लाजवेल असं काम; हुश्शार कावळ्याचा VIDEO VIRAL

विहिरीवर शांतपणे पाणी पिणाऱ्या सिंहांचं लक्षही त्या माणसाकडे गेले. मग ती व्यक्ती थरथर कापू लागली, अंगाला घाम फुटला आणि घाबरत-ओरडत तिने दरवाजा पुन्हा बंद केला. सिंह पुन्हा पाणी पिऊ लागले.  आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात त्याने सिंहांना कैद केलं. परत काही त्याने भीतीने दरवाजा खोलायची हिंमत केली नाही. गुपचूप तो त्या सिंहांना पाहत होता.

हे वाचा - Shocking! शवपेटीत तब्बल 50 तास जिवंत दफन झाला आणि...; VIDEO पाहूनच हादराल

आयएफएस अधिकारी साकेत यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. जेव्हा तुम्ही दरवाजा उघडाल आणि समोर असं दृश्यं दिसेल तर तुम्ही काय कराल, असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे. त्यावर बऱ्याच मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत.

Published by: Priya Lad
First published: April 2, 2021, 6:40 PM IST

ताज्या बातम्या