बीजिंग, 20 एप्रिल : सर्कस पाहायला अनेकांना आवडतं. भारतात बंदी असली तरी काही देशांत आजही सर्कशीत प्राण्यांचे खेळ दाखवले जातात. ज्यात वाघ, सिंह, हत्ती असे जंगली आणि खतरनाक प्राणी असतात. अशाच एका सर्कशीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. ज्यात सिंहांचा खेळ दाखवला जात होता. पण अचानक सिंह पिंजरा तोडून बाहेर आले. धडकी भरवणारा असा हा व्हिडीओ आहे. एका सर्कशीत दोन सिंहांचा खेळ दाखवला जात होता. कधी टेबलवर हे सिंह चढताना दिसले तर कधी रिंगमधून उडी मारताना दिसले. त्यांचा हा खेळ पाहून प्रेक्षकांनी आनंद होत होता. प्रेक्षक आनंदाने ओरडत होते, टाळ्या वाजवत होते. पण अचानक असं काही घडलं की सर्वांना धडकी भरली. ज्या सिंहांना पाहून सर्वजण आनंदात ओरडत ते होते ते भीतीने ओरडू लागले. कारण सर्कशीत पिंजऱ्यात असलेला सिंह पिंजऱ्याबाहेर आले होते.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता गोलाकार पिंजऱ्यात हे दोन सिंह आहेत. त्यांच्यासोबत त्यांना आपल्या तालावर नाचवणारे दोन रिंगमास्टर आहेत. व्हिडीओ तुम्ही नीट पाहिला तर सिंह खेळण्याचा मूडमध्ये नाहीच. त्यांना काही करून पिंजऱ्याबाहेर यायचं आहे. आधी ते पिंजऱ्याला आपटतात. पिंजऱ्याला धडक देत पिंजऱ्या तोडण्याचा, खोलण्याचा प्रयत्न करतात. चारही बाजूंनी ते प्रयत्न करतात. अखेर एका बाजूने पिंजऱ्याचं दार उघडतं आणि दोन्ही सिंह त्यातून बाहेर पडतात. OMG! वेदना होऊन सूजलं हाताचं बोटं, पाहिलं तेव्हा त्यात सापाचं…; व्यक्तीही शॉक पिंजऱ्याबाहेर येताच सिंह प्रेक्षकांच्या दिशेने येताना दिसतात. तेव्हा एकच खळबळ उडते. सर्व प्रेक्षक घाबरतात आणि तिथून पळत सुटतात. यापुढे काय झालं ते मात्र या व्हिडीओत दिसत नाही आहे.
Luoyang, Henan, China
— We Are Not Food (@WeAreNotFood) April 16, 2023
Everything went wrong!
It is clear that these animals do not want to do these silly tricks. Leave the animals alone and let them live their lives in peace.
I think these lions look skinny. How are they punished now? Beating and starving?#animalcruelty pic.twitter.com/ypkV4HNx7c
हा व्हिडीओ चीनमधील असल्याचं सांगितलं जातं आहे. हेनान प्रांतातील लुओयांगमधील ही घटना आहे. ग्लोबल टाइम्सच्या वृत्तानुसार, पिंजऱ्याबाहेर आल्यानंतर सिंह तिथं काही वेळ फिरत होते. त्यानंतर या दोन्ही सिंहांना पकडण्यात आलं आहे. घटनेत कुणीही जखमी झालेलं नाही.