मराठी बातम्या /बातम्या /Viral /

साध्या श्वानाने जंगलाच्या राजावर जंगलातच घुसून केला हल्ला; काय झाला लढाईचा शेवट पाहा VIDEO

साध्या श्वानाने जंगलाच्या राजावर जंगलातच घुसून केला हल्ला; काय झाला लढाईचा शेवट पाहा VIDEO

श्वान आणि सिंह यांच्या जबरदस्त लढाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

श्वान आणि सिंह यांच्या जबरदस्त लढाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

श्वान आणि सिंह यांच्या जबरदस्त लढाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 31 मे : सिंह ज्याला जंगलाचा राजा म्हणतात. जंगलात राहणाऱ्या भल्याभल्या प्राण्यांचंही त्याच्यासमोर काहीच चालत नाही. तो दिसताच सर्वजण पळ काढतात (Lion dog video viral). पण सामान्यपणे मानवी वस्तीशी सर्वात जास्त संपर्कात असणाऱ्य़ा एका साध्या श्वानाने मात्र जंगलाच्या या राजाशीच पंगा घेतला आहे. जंगलात घुसूनच त्याने सिंहाला आव्हान दिलं आहे (Lion dog fighting video viral). सिंह आणि कुत्र्याच्या या लढाईचा शेवटही धक्कादायक आहे (Lion vs dog). श्वानाने सिंहालाच चॅलेंज करण्याची डेअरिंग केली आहे. आता सिंह आणि श्वान एकमेकांसमोर उभे ठाकले तर कोण जिंकेल असं विचारलं तर साहजिकच याचं उत्तर सिंह असेल. सिंह आणि श्वान दोघांच्याही ताकदीची कल्पना आपल्याला आहे. कितीतरी हिंस्र प्राण्यांचा सिंहासमोर टिकाव लागत नाही पण एक साधा कुत्रा काय आहे. एकाच फटक्यात सिंहाने श्वानाचा फडशा पाडला असेल असंच तुम्ही म्हणाल पण हा व्हिडीओ पाहून चक्रावून जाल. आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. हे वाचा -  VIDEO - बिबट्यासारख्या खतरनाक प्राण्यालाही एकटा पुरून उरला साधा श्वान; क्षणात उलटवला डाव व्हिडीओत पाहू शकता एक जंगल दिसतं आहे. त्यात दोन प्राणी एकमेकांशी लढताना दिसत आहेत. सुरुवातीला धुळीमुळे काही स्पष्ट दिसत नाही. पण हळूहळू संपूर्ण चित्र स्पष्ट होतं. ज्या दोन प्राण्यांमध्ये लढाई होत आहे ते चक्क श्वान आणि सिंह आहे. एका साध्या श्वानाने थेट जंगलात घुसून जंगलाचा राजा सिंहाशीच पंगा घेतला आहे. सिंह आणि कुत्रा आमनेसामने आहेत. आता सिंहाला पाहिलं की कोणताही प्राणी पळून जाईल. पण हा श्वान अगदी छाती ताणून सिंहासमोर उभा राहतो. त्याच्यावर मोठमोठ्याने भुंकतो. सिंह त्याच्यावर हल्ला करतो श्वानही तितक्याच हिमतीने त्याला प्रतिकार करतो. अखेर हा श्वान काही आपल्या तावडीत सापडत नाही, हे सिंहालाही कळून चुकतं. त्यामुळे तोही वार करणं थांबवून शांत उभा राहतो. त्यानंतर श्वान गुपचूप त्याच्यासमोरून निघून जातो आणि सिंह मात्र बिच्चारा त्याच्याकडे एकटक पाहत राहतो. तो काहीच करत नाही. हे वाचा - VIDEO: 3 हिंस्त्र सिंहांसोबत भिडली एकटी मगर; लढाईचा शेवट बघाच इतक्या खतरनाक प्राण्याच्या तावडीतूनही श्वानाने एकट्याने स्वतःच स्वतःची सुटका करून घेतली. लढाईचा अनपेक्षित असा शेवट झाला आहे. जो पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत. व्हिडीओ पाहून लोकांना आपल्या डोळ्यांवरही विश्वास बसत नाही आहे. श्वानाच्या हिमतीला सर्वांनी दाद दिली आहे.
First published:

Tags: Dog, Viral, Viral videos, Wild animal

पुढील बातम्या