मराठी बातम्या /बातम्या /Viral /बापरे! माकडांच्या 2 गटात जबरदस्त भांडणं; एकमेकांना धू धू धुतलं, कधीही पाहिला नसेल असा VIDEO

बापरे! माकडांच्या 2 गटात जबरदस्त भांडणं; एकमेकांना धू धू धुतलं, कधीही पाहिला नसेल असा VIDEO

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की अनेक माकडं दोन वेगवेगळ्या गटांमध्ये विभाजून एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारत आहेत.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की अनेक माकडं दोन वेगवेगळ्या गटांमध्ये विभाजून एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारत आहेत.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की अनेक माकडं दोन वेगवेगळ्या गटांमध्ये विभाजून एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारत आहेत.

नवी दिल्ली 03 डिसेंबर : माकड हे अतिशय मस्ती करणारं आणि मजेशीर प्राणी आहे. माकडाच्या मस्तीचे अनेक निरनिराळे व्हिडिओ तुम्ही आजपर्यंत पाहिले असतील. माकडांची मस्ती अनेकदा आपल्या चेहऱ्यावरही हसू घेऊन येते. मात्र, अनेकदा हीच माकडे इतकं भयंकर रूप घेतात की पाहणाऱ्याचाही थरकाप उडतो. अनेकदा ही माकडं माणसांवरही हल्ला (Monkey Attacks on Human) करतात. अनेकदा तुम्ही माकडांना एकमेकांसोबत भिडतानाही (Monkey Fight) पाहिलं असेल.

आज आम्ही तुम्हाला माकडांच्या भांडणाचा असाच एक व्हिडिओ दाखवणार आहोत. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल की माकडांच्या भांडणाचा (Fight Between Two Groups of Monkeys) असा व्हिडिओ याआधी कधीच पाहिला नाही. सोशल मीडियावर सध्या माकडांच्या लढाईचा अतिशय भीतीदायक व्हिडिओ व्हायरल (Viral Video of Monkey) होत आहे. या व्हिडिओमध्ये माकडांचे दोन गट आपसात भांडताना दिसतात. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की अनेक माकडं दोन वेगवेगळ्या गटांमध्ये विभाजून एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारत आहेत. व्हिडिओ पाहून तुम्हालाही असं वाटेल जणू दोन राज्यातील सैन्य आपसात भिडलं आहे.

या व्हिडिओमधील माकडांच्या भांडणाची स्टाईल पाहून तुम्हालाही हसू येईल. हा व्हिडिओ @Animal_World नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. तुम्ही पाहू शकता की एका जंगलात माकडांच्या दोन गटांमध्ये काहीतरी कारणावरुन वाद होतो. यानंतर दोन्ही गटांमध्ये भांडण सुरू होतं. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की अनेक माकडं एकमेकांना मारत आहेत.

सुमारे 15 सेकंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. तुम्हीही पाहू शकता की दोन्हीतील एकही गट मागे हटण्यास तयार नाही. ते एकमेकांवर हल्ला करत आहेत. दोन्ही गटातील अनेक माकडांनी आपल्यासोबत आपली पिल्लेही घेतलेली आहेत.

First published:

Tags: Shocking video viral, Wild animal