मुंबई, 11 मार्च : सिंह म्हणजे जंगलाचा राजा. ज्याला भलेभले प्राणी घाबरतात. कित्येक प्राण्यांची त्याच्यासमोर हवा टाईट होते. पण हाच सिंह चक्क पाण्याला घाबरला आहे. पाण्याला घाबरणाऱ्या या सिंहाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. पाण्यात जाताच सिंहाची अवस्था लय बेक्कार झाली आहे. पण सिंह पाण्याला का घाबरला, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. चला तर मग पाहुयात नेमकं काय घडलं? व्हिडीओत तुम्ही पाहू शकता सुरुवातीला सिंह एका नदीच्या किनाऱ्याजवळ दिसतो आहे. त्याच्या चेहऱ्यावर तो रूबाब, इतरांना भीती वाटेल असे भाव नाहीत. तर उलट या सिंहाच्याच चेहऱ्यावर भीती आहे. तो खूप घाबरलेला दिसतो आहे. तसं पाहिलं तर त्याच्यासमोर दुसरं कुणीच नाही आहे. मग सिंहाच्या चेहऱ्यावरील ही भीती कसली? पॉवर ऑफ ‘आईची चप्पल’! शिकारीसाठी आलेली खतरनाक मगरही धूम ठोकून पळाली; पाहा VIDEO तुम्ही नीट पाहिलं तर सिंह आपले पुढील पाय उचलतो आणि पाण्यात टाकण्याचा प्रयत्न करतो पण तो लगेच पाय मागे घेतो. पाण्यात जाऊ की नको, पाण्यात पाय टाकू की नको, असं त्याला होतं आहे. शेवटी तो पाण्याच्या मध्ये असलेल्या दगडांवरून चालताना दिसतो. दगडांवर चालत थोडं पुढे घेतल्यानंतर आणखी पुढे जाण्याचं धाडस त्याचं काही होत नसतं. तो तसाच पुन्हा मागे यायला बघतो. पण तरी हिंमत करत कसंबसं तो पुन्हा पुढे जातो. पाण्यात उतरतो आणि पाण्यावर पाय मारतो, जसं काही तो काहीतरी चाचपून पाहत आहे. हळूहळू करत अखेर तो नदीच्या एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत पोहोचतो. घाबरत घाबरत अखेर तो नदी पार करतो, तेव्हा कुठे त्याच्या जिवात जीव येतो. वाघ आला रे! जीव मुठीत धरून पळाले लोक, पण शेवटी दोघं…; भंडाऱ्याच्या शेतातील भयंकर दृश्य Maasai Sightings यूट्युब अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आता सिंह खरंच पाण्याला घाबरला की आणखी काही? तुम्हाला काय वाटतं?
सिंह जंगलाचा राजा असला तरी प्रत्येक प्राण्याच्या शिकारीची एक हद्द असते. प्रत्येक प्राणी त्या त्या परिसराचा राजा असतो. त्यामुळे एक शिकारी दुसऱ्याच्या राज्यात जाण्याआधी खूप विचार करतो. याला सिंहही अपवाद नाही. व्हिडीओमध्ये दिलेल्या माहितीनुसार सिंह पाण्याला नाही तर पाण्यातील सिकंदर म्हणजे मगरीला घाबरत आहे. कारण पाण्यात मगरीचं राज्य असतं, हे त्यालाही चांगलंच माहिती आहे. त्यामुळे इथं तो आपली हिंमत दाखवण्याची हिंमत बिलकुल करत नाही.

)







