नागपूर, 25 मे : तुम्ही सोशल मीडियावर (Social media) असाल आणि तिथं व्हायरल व्हिडीओ (Viral video) पाहत असाल तर सलूनमध्ये गोंधळ घालणारा तो छोटासा, क्युट, गुबगुबीत मुलगा तुम्हाला नक्कीच आठवत असेल. हो बरोबर तोच मुलगा. नागपूरचा (Nagpur) अनुश्रूत (Anushrut). छोटासा रागिष्ट असा हेअरकट बॉय. त्याचा केस कापताना आता नवा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात त्याने न्हाव्याला पुन्हा धमकी दिली आहे. अनुश्रूत यावेळी आपले केस कापायला सलूनमध्ये गेला नाही आहे तर न्हावीच त्याच्या घरी केस कापायला आला आहे. यावेळीही या क्युट अनुश्रूतने आपला दबंग अवतार दाखवला. याआधी त्याने न्हाव्याला त्याचे केस कापण्याची धमकी दिली होती. तर यावेळी तर तो थेट मारहाणीवरच उतरला आहे. थेट मारण्याचीच धमकी दिली आहे.
My kid Anushrut New haircut Video - 3.1, Take Some Positive Dose🤣😂
— Anup Jiwan Petkar (@Anup20992699) May 23, 2021
Link - https://t.co/GBpbrMrX1D… @viralbhayani77 #anushrut @KapilSharmaK9 @RichaChadha @news @aajtak #funny @TooYumm #mems @iTIGERSHROFF @mattyglesias @anuragkashyap72 #IPL2021 @divyadutta25 pic.twitter.com/EDcCmiRPui
अनुश्रूतच्या वडिलांना त्याचा हा व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओत पाहू शकता अनुश्रूत खुर्चीवर बसला आहे. न्हावी त्याचे केस कापतो आहे. त्यावेळी अनुश्रूत त्याला मै आपको उडा डालूंगा, मारपीट करूंगा असं म्हणताना दिसतो आहे. मुझे गुस्सा आ रहा है, असंही तो म्हणतो. हे वाचा - बापरे! 5 कोटीत झाला 55 सेकंदाच्या VIDEO चा लिलाव, पाहा यात असं नेमकं काय आहे? पण गेल्या वेळीप्रमाणे अनुश्रूतचा राग यावेळी जास्त वेळ टिकला नाही. सुरुवातीला न्हाव्याला थोडी धमकी दिल्यानंतर तो त्याला हेअरकटवाले अंकल, हेअरकटवाले अंकल म्हणत त्याच्याशी छान गप्पा मारतानाही दिसतो. त्यानंतर अगदी सुरात ए,बी,सी,डी सुद्धा म्हणतो.