नवी दिल्ली, 12 जानेवारी : भारतातील प्राणिसंग्रहालयांत प्रेक्षकांना प्राण्यांना हात लावायला बंदी आहे. पण ही बंदी नसती तर, लोकांनी अजब गोष्टी करत रोज नव्या बातम्या ऐकायला मिळाल्या असत्या. पण सिंगापूर, आफ्रिकी देश आणि युरोपातील देशांमध्ये माणसांना प्राणी संग्रहालयांतील प्राण्यांच्या अंगावरून हात फिरवायला, कुरवाळायला परवानगी असते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
दक्षिण आफ्रिकेतील एका प्राणिसंग्रहालयात पीटर नावाचा एक व्यक्ती वाघ बघायला आलेला. पीटरने जाळीतून पलीकडच्या बाजूला असलेल्या वाघाच्या मानेवरुन हात फिरवला. त्याला अगदी कुत्र्याला कुरवाळतो तसं कुरवाळलं. त्या वाघाच्या शेजारी वाघिण होती ती शांत होती. पण थोड्या वेळाने अचानक त्या वाघिणीला काय वाटलं, ती एकदम पुढे आली आणि पीटरच्या उजव्या हाताला जबड्यात धरून आत ओढायला लागली.
तिच्या जबड्याची पकड खूपच मजबूत होती त्यामुळे पीटर घाबरला. त्याच्या मागून एक महिला ओरडायला लागली. पीटरने हात सोडवण्याचा प्रयत्न केला. पण वाघिणीची पकड घट्ट होती. सुदैवाने पीटरचा हात सोडवून घेण्यात त्याला यश आलं. आणि तो वाघिणीच्या तावडीतून सुटला. हा सगळा प्रकार पीटरच्या पत्नीनेच मोबाइलमध्ये शूट केला आहे. त्यामुळे त्याचा हात वाघिणीने पकडल्यावर ती ओरडत असल्याचं लक्षात येतंय. पीटरला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची परिस्थिती गंभीर आहे असं स्थानिक बातम्यांमध्ये म्हटलं आहे.
They never learn pic.twitter.com/KDtWPRYrCr
— African (@ali_naka) April 10, 2019
हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आफ्रिकन या ट्विटर हँडलवरून ट्विट करण्यात आला असून त्याने यावर प्रतिक्रियाही दिली आहे. ‘They never learn’ अशी त्याची प्रतिक्रिया खूप बोलकी आहे.