जाहिरात
मराठी बातम्या / Viral / LinkedIn form : 1985 मधला नोकरीचा अर्ज होतोय व्हायरल; मैत्रीची कहाणी सांगणारी पोस्ट चर्चेत

LinkedIn form : 1985 मधला नोकरीचा अर्ज होतोय व्हायरल; मैत्रीची कहाणी सांगणारी पोस्ट चर्चेत

1985मधला नोकरीचा अर्ज होतोय व्हायरल; मैत्रीची कहाणी सांगणारी पोस्ट चर्चेत

1985मधला नोकरीचा अर्ज होतोय व्हायरल; मैत्रीची कहाणी सांगणारी पोस्ट चर्चेत

प्रत्येकाच्या जीवनात मैत्रीच्या (Friendship) नात्याला विशेष स्थान असतं. आपल्या जीवनात कितीही कठीण प्रसंग आला तरी त्यावेळी मदतीसाठी खरा मित्रच (Friend) धावून येतो.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 11 ऑगस्ट : प्रत्येकाच्या जीवनात मैत्रीच्या (Friendship) नात्याला विशेष स्थान असतं. आपल्या जीवनात कितीही कठीण प्रसंग आला तरी त्यावेळी मदतीसाठी खरा मित्रच (Friend) धावून येतो. खरं तर जीवनातल्या प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणी जो साथ देतो तोच खरा मित्र असतो. सध्या अशाच एका मैत्रीची कहाणी सोशल मीडियावर (Social Media) चर्चेचा विषय ठरली आहे. एका महिलेनं वडिलांच्या मित्राविषयीची एक पोस्ट लिंक्डइनवर (LinkedIn form) शेअर केली आहे. सध्या ही पोस्ट जोरदार व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये वडिलांच्या मित्रानं त्यांना नोकरीसाठी अर्ज लिहिण्याकरिता कशी मदत केली हे या महिलेनं नमूद केलं आहे. `झी न्यूज हिंदी`ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

    जाहिरात

    एअर इंडियाच्या कमर्शियल लीड रवीना मोरे (Ravina More) यांनी एका मैत्रीची कहाणी सांगणारी पोस्ट लिंक्डइनवर शेअर केली आहे. माझ्या वडिलांना त्यांच्या एका जवळच्या मित्राने 80 च्या दशकात नोकरी (Job) मिळण्यासाठी कशी मदत केली, याची कहाणी रवीना यांनी या पोस्टच्या माध्यमातून सांगितली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी 1985 मधला हस्तलिखित अर्जही (Handwritten Application) शेअर केला आहे. या अर्जातलं हस्ताक्षर सुंदर आहे. पोस्टवर टिप्पणी करणाऱ्या अनेकांनी त्यावर सहमती दर्शवली. रवीना यांची ही पोस्ट 27 हजारपेक्षा अधिक व्यक्तींना आवडली आहे. यापैकी बहुतांश जण ही पोस्ट वाचून भावनिक झाल्याचं दिसलं.

    हे ही वाचा :  Nerve Pulling Relief : तुम्हालाही बऱ्याचदा शीर चढल्याने वेदना होतात का? करा हे घरगुती उपाय

    पुढील आठवड्यात निवृत्त होत असलेल्या वडिलांना त्यांच्या सर्वांत जवळच्या आणि विश्वासू मित्राबद्दलची आठवण रवीना यांनी करून दिली आहे. हा नोकरीचा अर्ज त्यांनी थरमॅक्स कंपनीला लिहिला होता. त्या वेळी रवीना यांच्या वडिलांनी ‘ट्रेनी इंजिनीअर-मॅन्युफॅक्चरिंग प्रॉडक्शन’ या पदासाठी हा अर्ज केला होता.

    जाहिरात

    या पोस्टमध्ये रवीना लिहितात, `माझे वडील 80 च्या दशकात पदवीधर झाले. तेव्हा कॅम्पस प्लेसमेंट (Campus Placement) ही संकल्पना फारशी प्रचलित नव्हती. त्या वेळी ते आयुष्यात पहिल्यांदाच नोकरीसाठी अर्ज करत होते. रेझ्युमेचा (Resume) मसुदा तयार करण्यासाठी, तसंच नोकरीचा अर्ज लिहिण्यात त्यांना अडचण येत होती. त्यांचे सर्वांत जवळचे मित्र प्रकाश काका यांचं इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होतं. तसंच त्यांची लेखनशैलीही उत्तम होती. त्या वेळी प्रकाश काका माझ्या वडिलांचे तारणहार ठरले. त्यांनी वडिलांसाठी नोकरीकरिता 10 अर्ज लिहिण्यापासून ते इंटरव्ह्यूमध्ये कसं बोलायचं याची तयारी करून घेण्यापर्यंत कोणतीही कसर सोडली नाही.`

    जाहिरात

    रवीना मोरे यांनी सांगितलं, की `मी जो नोकरीसाठीचा अर्ज शेअर केला आहे, तो प्रकाश काकांनी 1985 मध्ये माझ्या वडिलांसाठी लिहिला होता. हस्तलिखित अर्ज आता भूतकाळात जमा झाले आहेत. मित्रांना करिअरमध्ये संधी मिळावी यासाठी आपल्या मित्राच्या रेझ्युमेचं पुनरावलोकन करणारे. मित्रांसोबत संदर्भ, कंपनी आणि उद्योगांविषयीची माहिती शेअर करणारे आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे त्या कठीण काळात एकमेकांसोबत राहणारे मित्र कायम एकमेकांसोबत राहतात.

    जाहिरात

    हे ही वाचा :  Sugar Free Sweet : गोड खायला घाबरताय? रक्षाबंधनाला ट्राय करा या शुगर फ्री मिठाई

    एका कंपनीचा अर्ज दुसऱ्या कंपनीकडे पाठवणं, यासारख्या चुकाही त्या वेळी माझे वडील करत होते; पण एक मित्र म्हणून प्रकाश काका माझ्या वडिलांना सतत पाठिंबा आणि प्रोत्साहन देत असत. प्रकाश काकांनी त्यांना नोकरी मिळावी, यासाठी नेहमीच मदत केली,` असं रवीना आवर्जून नमूद करतात.

    जाहिरात
    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात