मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Nerve Pulling Relief : तुम्हालाही बऱ्याचदा शीर चढल्याने वेदना होतात का? करा हे घरगुती उपाय

Nerve Pulling Relief : तुम्हालाही बऱ्याचदा शीर चढल्याने वेदना होतात का? करा हे घरगुती उपाय

जेव्हा नसांमध्ये तीव्र वेदना होत असतात. ज्यामुळे कधीकधी आपल्या दैनंदिन जीवनात व्यत्यय येतो. जर तुम्हालाही अशा प्रकारचा त्रास होत असेल. तर या उपायांच्या मदतीने तुम्ही नसांमधील वेदना दूर करू शकता.

  • Published by:  Pooja Jagtap
मुंबई, 11 ऑगस्ट : सतत बसून काम केल्याने किंवा प्रवासादरम्यान नसांमध्ये वेदना होतात. आपण त्याला शिरावर शीर चढणेदेखील म्हणतो. मात्र या स्थितीचा आपल्याला खूप त्रास होतो. जेव्हा नसांमध्ये तीव्र वेदना होत असतात. ज्यामुळे कधीकधी आपल्या दैनंदिन जीवनात व्यत्यय येतो. जर तुम्हालाही अशा प्रकारचा त्रास होत असेल. तर आज आम्ही तुमच्यासाठी काही सोपे आणि रामबाण असे उपाय घेऊन आलो आहोत. या उपायांच्या मदतीने तुम्ही नसांमधील वेदना दूर करू शकता.. आंघोळीच्या पाण्यात टाका सैंधव मीठ नसांमध्ये वेदना कमी करण्यासाठी सैंधव मीठ प्रभावी आहे. मिठात मॅग्नेशियम भरपूर असते. यात नासाच्या वेदना कमी करण्याचे गुणधर्म आहेत. आंघोळीच्या पाण्यात 2 कप रॉक मीठ घाला आणि चांगले मिसळा. मीठ पूर्णपणे विरघळले की, वेदनादायक भागावर सुमारे 30 मिनिटे मीठ पाणी घाला. यामुळे वेदना कमी होण्यास मदत होईल.

Skin Care Tips : तुम्हीही मिळवू शकता सुंदर आणि ग्लोइंग स्किन, फक्त फॉलो करा या 5 सोप्या टिप्स

तुमच्या आहारात हळद घाला हळदीतील औषधी गुणधर्म नसांच्या वेदनांवर उपचार करण्यासाठी फायदेशीर असल्याचे मानले जाते. हळदीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे नसांच्या वेदना कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात हळद घालू शकता. एक ग्लास दुधात १/४ चमचे हळद आणि चिमूटभर काळी मिरी पावडर टाकून आठवडाभर प्यायल्यास चांगला परिणाम मिळतो. अ‍ॅपल सायडर व्हिनेगर अ‍ॅपल सायडर व्हिनेगरचा वापर शरीराच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी केला जाऊ शकतो आणि या समस्यांमध्ये नसांच्या वेदनांचाही समावेश होतो. अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगरमध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस, कॅल्शियम आणि पोटॅशियम असते आणि त्याचा परिणाम नसांच्या वेदनांवर जलद होतो. 2-3 चमचे अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर आणि 1 चमचा मध एक ग्लास कोमट पाण्यात घालून आठवड्यातून दोनदा प्यायल्यास नसांच्या वेदना कमी होतात. Tamarind Leaves Benefits : नैसर्गिकरित्या केस होतील काळे, हे आहेत चिंचेच्या पानांचे 5 आश्चर्यकारक फायदे गरम पाणी किंवा बर्फाचा शेक नसांच्या वेदना कमी करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे प्रभावित भागात गरम किंवा थंड कॉम्प्रेस लावणे. मात्र दुखापत किंवा वेदना झाल्यानंतर पहिल्या 48 तासांपर्यंत उबदार कॉम्प्रेस वापरू नये. आइस पॅक लावल्याने वेदनादायक भागात सूज कमी होण्यास मदत होते. वेदनादायक भागात गरम आणि बर्फाच्या पॅकचा एक स्थिर पर्यायी वापर स्नायूंना आराम देण्यास आणि वेदना कमी करण्यास मदत करू शकतो. याशिवाय नियमित व्यायाम आणि अंडी, दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थांसह व्हिटॅमिन बीचे सेवन हाडे आणि नसा निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर आहे.
First published:

Tags: Health Tips, Home remedies, Lifestyle

पुढील बातम्या