नवी दिल्ली, 11 मे : चिकन, डुकराचे मांस आणि गोमांस हे जगभर लोकप्रिय पदार्थ आहेत आणि लोक ते मोठ्या उत्साहाने खातात, पण कुणी मानवी मांसही खाऊ शकतं, याचा तुम्ही विचार तरी केला होता का? जगभरात मानवी मांस खाण्यावर बंदी आहे. पण तरी काही लोक गुपचूप ते खातात. एखाद्याची हत्या करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे करून खाल्ले, अशी भयंकर गुन्ह्याची प्रकरणंही तुम्हाला माहिती असतील. मानवी मांस खाल्लेल्या अशाच माणसांनी मानवी मांसाची चव कशी असते, याचं उत्तरही दिलं आहे. स्पेनच्या 20 वर्षीय पॉला गोनू या महिलेने नुकतंच कबुल केलं की तिने तिच्या गुडघ्याचा काही भाग खाल्ला आहे. ऑपरेशननंतर हा भाग काढण्यात आला. 2021 मध्येही एक प्रकरण समोर आलं होतं, एका जर्मन माणसाने माणसाला मारून खाल्लं. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, जेव्हा या लोकांकडून चव जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, तेव्हा काय उत्तर मिळाले ते पाहा.
1920 च्या दशकात प्रथम, अमेरिकन विल्यम बुहेलर सीब्रूकने मानवी मांस खाणाऱ्या आफ्रिकन समुदायातील गुएरोच्या लोकांना भेटले. त्यांनी स्वतःही त्यांच्यासोबत कच्चं मांस चाखलं. त्यांनी त्यांच्या ‘जंगल वेज’ या पुस्तकात त्यांचा अनुभव लिहिला आहे. त्यात त्यांनी म्हटलं कच्चं मानवी मांस गोमांससारखं दिसतं, परंतु त्यात कमी लालसरपणा आहे. चरबीसह हलका पिवळसरपणा दिसतो. शिजवल्यानंतर ते राखाडी झालं आणि गोमांससारखा वास येऊ लागला. त्याची चव वीलसारखी होती. विचित्रच! कधी झुरळ तर कधी कात्री; आत्तापर्यंत मानवी शरीरात सापडल्यात ‘या’ वस्तू मेवेस नावाच्या माणसाने सांगितलं की मानवी मांसाची चव डुकराच्या मांसासारखी असते परंतु थोडी अधिक कडू असते. तर जपानी नरभक्षक इस्से सागावा यांनी त्याचे वर्णन टूना माशासारखे ‘कोमल आणि मऊ’ असं केलं आहे. सागावाने 1981 मध्ये रेनी हार्टवेल्ट नावाच्या डच महिलेची हत्या केली आणि तिचं मांस खाल्लं. 1972 च्या अँडीज विमान अपघातात जिवंत राहण्यासाठी अनेकांना सहप्रवाशांचे मांस खाण्यास भाग पाडलं गेलं. त्यापैकी बहुतेकांनी गोठवलेलं मांस चव नसलेलं असल्याचं सांगितलं. यापैकी एक नंदो पारडो म्हणाले, “जेव्हा मी पहिला तुकडा खाल्ला तेव्हा त्याला चव नव्हती. मी जबरदस्तीने ते गिळलं. गेल्या वर्षी रशियाच्या व्लादिमीर निकोलायेविच निकोलायव्ह यांनी 1997 मध्ये पहिल्यांदा मानवी मांस कसं खाल्लं ते सांगितले. जर तुम्हाला कच्चे मांस आवडत नसेल तर ते उकळून घ्या, असं ते म्हणाले. ‘ये ढाई किलो का हाथ’ अशा व्यक्तीचा की, PHOTO पाहूनच तोंडात बोटं घालाल विज्ञानानुसार मानवी मांसामध्ये भरपूर मायोग्लोबिन प्रोटीन असते. म्हणूनच ते गोमांससारखं लाल होत नाही. मानवी मांसाची प्रयोगशाळेत तपासणी केली असता त्यात गोमांससारखे काही फायबर असल्याचे आढळून आले.