बीजिंग, 01 जून : बऱ्याचदा भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना घरमालक काही ना काही कारणावरून त्रास देत राहतात. असंच एक प्रकरण. ज्यात भाड्याच्या घरात राहणाऱ्या एका महिलेला तिच्या घरमालकाने घरी येऊ नको, हॉटेलमध्ये जा असा मेसेज केला. घरमालकाचा हा मेसेज पाहून ती घाबरली पण घरीच गेली. त्यानंतर तिथं तिनं जे दृश्य पाहिलं ते पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. चीनमधील हे प्रकरण आहे. वांग नावाची महिला ऑफिसमध्ये होती तेव्हा तिच्या घरमालकिणीच्या मुलीचा फोन आला. ज्यात तिने तिला घरी येण्याऐवजी हॉटेलमध्ये राहण्याचा सल्ला दिला. आज तुम्ही घरी येऊ नका काही दिवस हॉटेलमध्ये राहा कारण आम्ही कुणाच्या तरी मृत्यूचा शोक करण्यसाठी तुमच्या फ्लॅटचा वापर करत आहोत, असं तिनं सांगितलं.
तरी वांग घाबरून आपल्या घरी गेली. पण तिथं तर आणखी भयानक परिस्थिती होती. तिने पाहिलं की तिच्या बेडरूममध्ये शवपेटी ठेवली होती आणि त्याच्या आजूबाजूला लोक बसून रडत होते. ती लगेच घराबाहेर पडली आणि हॉटेलमध्ये गेली. पण तिने घरमालकाला सोजलं नाही. तिने त्याच्यासोबतचा भाडेकरार मोडला आणि त्याच्याविरोधात केस केली. Video - बाईकवरून उतरताच अचानक गायब झाली व्यक्ती; CCTV मध्ये कैद झालं धक्कादायक दृश्य याबाबत ली नावाच्या घरमालकिणीने सांगितलं की वांगने घर भाड्याने घेण्याआधी ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला ती तिथं राहत होती. त्यामुळे तिच्या मृत्यूनंतर त्या घराचा तिच्यासाठी वापर करणं परंपरेचा भाग होता. आपण वांगच्या हॉटेलचं बिल दिलं होतं आणि तिचं फ्लॅट जसा होता तसाच तिला परत गेला. चीनच्या जुन्या परंपरेमनुसार एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याचं मृतदेह शवपेटीच तीन दिवस त्याच्या घरात ठेवला जातो. ती व्यक्ती जिवंत होईल अशी भावना असते. सोबतच नातेवाईकही त्या व्यक्तीला भेटू शकतात. ना रहेगा बांस ना बजेगी बांसुरी! अभ्यासाचा कंटाळा म्हणून विद्यार्थ्यांनी शाळाच विकायला काढली? हे प्रकरण शांघाईच्या सोंगजियांग डिस्ट्रिक्ट पीपल्स कोर्टमध्ये गेलं. तिथं क्षेत्रीय परंपरा आणि मॉडर्न कॉन्ट्रॅक्टमधला वाद असल्याचं सांगण्यात आलं. शेवटी लँडलेडीला 90 हजार रुपयांची भरपाई द्यावी लागली.