मराठी बातम्या /बातम्या /Viral /महिला नागा साधूंचं रहस्यमय जग; त्या स्वतःला समजतात मृत अन् पिंडदानही...

महिला नागा साधूंचं रहस्यमय जग; त्या स्वतःला समजतात मृत अन् पिंडदानही...

काही गोष्टी समजणं आपल्या आवाक्याबाहेर असतात. असंच महिला नागा साधूंचं आयुष्य असतं.

काही गोष्टी समजणं आपल्या आवाक्याबाहेर असतात. असंच महिला नागा साधूंचं आयुष्य असतं.

काही गोष्टी समजणं आपल्या आवाक्याबाहेर असतात. असंच महिला नागा साधूंचं आयुष्य असतं.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    नवी दिल्ली, 9 जानेवारी : नागा साधू म्हटलं की शरीराला भस्म फासून लांब जटा धारण केलेली नग्न व्यक्ती आपल्या डोळ्यांसमोर येते. पण तुम्ही कधी महिला नागा साधूंविषयी ऐकलं आहे का? तुम्हाला माहिती आहे का, महिलांना नागा साधू होण्यासाठी कायकाय करावं लागतं? हे जर तुम्हाला समजल तर तुम्हीही चकित व्हाल. चला तर आज आम्ही तुम्हाला महिला नागा साधूंबाबत माहिती देणार आहोत.

    मध्य प्रदेश हे असं राज्य आहे, जिथं अनेक धार्मिक परंपरा पाळल्या जातात. उज्जैनची प्राचीन मंदिरं, पूजास्थळं, भगवान शंकराचं स्थान, एकीकडे हा सर्व मौल्यवान पुरातत्त्वीय वारसा आहे. तर दुसरीकडे हेच आपल्या श्रद्धेचं आदर्श केंद्र आहेत. हा मौल्यवान वारसा असल्यानं येथील संस्कृती देशभर ओळखली जाते. येथील काही परंपरा खूपच रहस्यमय व आश्चर्यकारक आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका परंपरेची ओळख करून देणार आहोत, ती म्हणजे महिला नागा साधू बनण्याची. महिला नागा साधू बनण्यासाठी असणारी प्रक्रिया समजल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

    फक्त पुरुषच नागा साधू बनतात, असा तुमचा समज असेल तर तो सर्वांत प्रथम दूर करा. कारण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, महिलाही नागा साधू बनतात. आगामी कुंभमेळ्यात महिला नागा साधूही सहभागी होणार आहेत. महिला नागा साधूंचेही स्वतःचे रहस्यमय जग आहे. या स्त्रिया नागा साधू बनण्यासाठी जी तपश्चर्या करतात, त्याबद्दल तुम्ही कधी विचारही केला नसेल. महिला नागा साधूंचे जग हे काही प्रमाणात पुरुष नागा साधूंसारखंच आहे.

    स्वतःच करावं लागतं पिंडदान

    एखादी स्त्री नागा साधू झाल्यावर तिला पुरुष नागा साधूसारखं जगावं लागत नाही. पुरुष नागा साधू आणि महिला नागा साधू यांच्या कपड्यांमध्ये फरक आहे. महिला नागा साधू नग्न आंघोळ करत नाहीत, त्यांना कपडे घालण्याची परवानगी आहे. एखाद्या महिलेला नागा साधू होण्यापूर्वी स्वतःचं श्राद्ध म्हणजे पिंडदान आणि तर्पण करावं लागतं, याचाच अर्थ त्या स्वतःला मृत समजतात.

    जैन साधू-साध्वी कधीच आंघोळ का करत नाहीत? कडाक्याच्या थंडीतही एकच पातळ कपडा वापरतात

    मुंडण करणं गरजेचं

    महिलांना नागा साधू बनण्यासाठी मुंडण करावं लागतं. शिवाय, तिला हेदेखील सिद्ध करावं लागतं की ती तिच्या कुटुंबापासून दूर गेली आहे. तिला कोणत्याही गोष्टीचा मोह राहिलेला नाही. या गोष्टीची खातरजमा करण्यासाठी आखाड्याचे साधू-संत संबंधित महिलेच्या कुटुंबाची चौकशी करतात. कुंभमेळ्यात नागा साधूंसोबत महिला साधूसुद्धा शाही स्नान करतात. महिला नागा साधूंना आखाड्यातील सर्व साधू-संत ‘माता’ म्हणतात आणि त्यांचा खूप आदर करतात.

    ब्रह्मचर्य पाळणं महत्त्वाचं

    कोणत्याही महिलेला नागा साधू बनण्यासाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे 10 वर्षे पूर्ण ब्रह्मचर्य पाळणं महत्त्वाचं आहे. जर एखादी स्त्री हे करू शकत नसेल, तर ती स्त्री नागा साधू होऊ शकत नाही. 10 वर्षे पूर्ण ब्रह्मचर्य पाळल्यानंतरच संबंधित महिलेला नागा साधू बनवण्याचा निर्णय घेतला जातो. हा निर्णय महिला नागा साधूंच्या गुरू करतात.

    दरम्यान, कुंभमेळ्यात नागा साधू सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र असतं. लोकांना हे साधू इतरांपेक्षा वेगळे वाटतात, त्यामुळे त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी लोकांना जास्त उत्सुकता असते. पण पुरुष नागा साधूंसोबतच महिला नागा साधूदेखील आहेत. या महिला नागा साधूंची स्वतःचेच एक रहस्यमय असे जग आहे.

    First published:

    Tags: Kumbh mela, Sadhu