रस्त्यावर नाचत होते तिघे, कोल्हापूर पोलीस येताच दोघे पळाले अन् तिसऱ्याला बसला नादखुळा चोप, पाहा हा VIDEO

कोल्हापूर पोलिसांनी या भावांचा असा काय नाद उतरवला की, परत असं करण्याची हिंमत होणार नाही.

कोल्हापूर पोलिसांनी या भावांचा असा काय नाद उतरवला की, परत असं करण्याची हिंमत होणार नाही.

  • Share this:
कोल्हापूर, 20 जुलै : कोल्हापूरकर म्हटले की, पार नादखुळाच. कोल्हापूरकर कधी काय करतील याचा नेम नाही. अशाच काही कोल्हापूरकरांनी लॉकडाउन लागल्यानंतरही मोकळ्या रस्त्यावर कारमध्ये गाणी लावून नाचण्याचा नादखुळा प्रकार केला. पण, कोल्हापूर पोलिसांनी या भावांचा असा काय नाद उतरवला की, परत असं  करण्याची हिंमत होणार नाही. कोल्हापुरातील रंकाळा टॉवरजवळ ही घटना घडली आहे. या घटनेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. रविवारी मध्यरात्रीपासून लॉकडाउन शहरात लागू झाला. त्यानंतरही काही महाभाग हे विनाकारण रस्त्यावर फिरत होते. रंकाळा टॉवरजवळ रात्री उशिरा कारमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावून तीन तरुण रस्त्यावर नाचत होते. तेवढ्यात पोलिसांनी एक गाडी तिथे पोहोचली. पोलिसांना पाहून दुचाकीवर असलेल्या मित्राने पळ काढला. पण, पोलिसांनी कारसमोरच गाडी उभी केल्यामुळे तरुणाला काही पळून जाता आले नाही. कारचालक तरुणाला पोलिसांनी भर रस्त्यावर चांगलाच चोप देत झिंग उतरवली. बरं, त्याच्या बाजूला असलेल्या मित्रालाही आधी प्रसाद पडला. पण दोन्ही पोलीस कर्मचारी जेव्हा बाजूला झाले तेव्हा या मित्राने कारचे दार उघडून धूम ठोकली आणि हातात चपल्ल घेऊन असा काय पळाला की परत मागे फिरून पाहिलंच नाही. पण, कार चालवणारा मित्र तावडीत सापडला आणि पोलिसांनी त्याला चांगलाच नांदखुळा धडा शिकवला. कोल्हापुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे आठवड्याभरासाठी कडक लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. कोरोनात कोरोनाबाधितांची संख्याही अडीच हजाराकडे जात आहे. आतापर्यंत 55 जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे.
Published by:sachin Salve
First published: