मुंबई 09 जानेवारी : तृतीयपंथी किंवा किन्नर हा शब्द तसा आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा आहे. स्त्री-पुरुषांप्रमाणेच हा देखील एक प्रकारचा समुदाय आहे जो स्त्री किंवा पुरुष यामध्ये येत नाही. या लोकांना ट्रान्सजेंडर म्हणून देखील ओळखलं जातं. अशा लोकांसाठी अनेक देशात वेगवेगळे कायदे करण्यात आले आहेत. जे त्यांना समाजात ताठ मानेने जगण्यासाठी महत्वाचे आणि फायद्याचे आहेत. तृतीयपंथी किंवा किन्नर हे इतर माणसांसारखे असले तरी देखील त्याच्याबद्दलच्या अशा अनेक गोष्टी आहेत. ज्या आपल्याला माहित नसतात. आता हेच पाहा ना किन्नर समुदायातील एकाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तरी देखील आपल्याला त्यांची अंतयात्रा कधीच पाहायला मिळत नाही. असं सांगितलं जातं की ते हे रात्रीच्या वेळी मुद्दाम नेतात. कारण कोणीही ते पाहू नये. पण असं का? तसे असं देखील सांगितलं जातं की, किन्नर समुदायातील एखाद्या सदस्याचा मृत्यू झाला की, त्याच्या प्रेताला चप्पलांनी मारले जाते आणि इतर लोक त्या व्यक्तीचा मृत्यू साजरा करतात. पण असं का? किन्नर समाजात असा प्रकार का केला जातो? चला जाणून घेऊ हे ही पाहा : महिला नागा साधूंचे हे रहस्य जाणून तुम्हाला धक्का बसेल बऱ्याच लोकांचा असा विश्वास आहे की तृतीयपंथीयांमध्ये एक विशेष शक्ती असते ज्याद्वारे त्यांना त्यांच्या मृत्यूची आधीच कल्पना येते. या दरम्यान ती व्यक्ती इतर लोकांपासून दूर राहते, कुठे ही येणे-जाणे बंद करते आणि खाणे-पिणे देखील बंद करते. त्यानंतर जेव्हा एखाद्या तृतीयपंथीयाचा मृत्यू होतो, तेव्हा तो कोणत्याही धर्माचा असो, त्याला अग्नी दिली जात नाही, तर त्याला दफन केलं जातं आणि यादरम्यान त्याचे इतर साथीदार प्रार्थना करतात की तो त्यांच्या किन्नर म्हणजे ‘हिजडा’ समाजात पुन्हा जन्म घेऊ नये. खरंतर किन्नरच्या मृत्यूनंतर त्याची शवयात्री काढली जाते. यादरम्यान त्याच्या शरीरावर शूज आणि चपल्लेनं मारलं जातं. असं केलं जातं कारण त्याने पुन्हा पुढच्या जन्म या समाजात जन्म घेऊ नये. तसेच समाजातील सर्व लोक या मेलेल्या व्यक्तीसाठी त्यांच्या देवताकडे प्राथना करतात आणि त्यांनी येथे पुन्हा जन्म घेऊ नये अशीच इच्छा मागतात. अंत्यसंस्काराचा कार्यक्रम आटोपल्यानंतर उर्वरित किन्नर साथी आठवडाभर उपाशीच राहतात. किन्नर साथीच्या मृत्यूनंतर, त्याचे साथीदार आनंदोत्सव करतात कारण त्यांचे जीवन नरकासारखे मानले जाते आणि मृत्यूनंतर त्यांच्या साथीदाराला मुक्ती मिळते असा देखील त्यांचा समज आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.