मराठी बातम्या /बातम्या /Viral /

OMG! भुकेल्या सापाने दुसऱ्या सापाला जिवंत गिळलं पण...; शेवटी जे घडलं ते आणखी धक्कादायक; Watch Video

OMG! भुकेल्या सापाने दुसऱ्या सापाला जिवंत गिळलं पण...; शेवटी जे घडलं ते आणखी धक्कादायक; Watch Video

सापाने सापाचीच केली शिकार. (फोटो सौजन्य - ओडिशी टीव्ही व्हिडीओ स्क्रिनशॉट)

सापाने सापाचीच केली शिकार. (फोटो सौजन्य - ओडिशी टीव्ही व्हिडीओ स्क्रिनशॉट)

सापाने सापाला गिळल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

  • Published by:  Priya Lad
भुवनेश्वर, 19 ऑगस्ट : सापांनी केलेल्या शिकारीचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तुम्हीही असे व्हिडीओ पाहिले असतील. सामान्यपणे कोणताही प्राणी दुसऱ्या प्राण्याची शिकार करतो. सापही तसाच आहे. पण सध्या सोशल मीडियावर असा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. कारण सापाने सापाचीच शिकार केली आहे. याचा शेवटही तितकाच धक्कादायक आहे. भुकेलेल्या एका सापाने दुसऱ्या सापाला जिवंत गिळलं. आता दोघंही साप त्यांचा आकार लांब. त्यामुळे सापाने सापाला पूर्ण गिळणं शक्यच होणार नाही. हेच या सापाच्या बाबतीतही घडलं. त्याने त्या सापाला निम्मा गिळलं आणि नंतर काही त्याला गिळता येईना किंवा त्याला अस्वस्थ झाल्यासारखं वाटलं त्यामुळे त्याने त्या गिळलेल्या सापाला पुन्हा तोंडातून बाहेर काढलं. पण नंतर ते दृश्य दिसलं ते पाहून नागरिकांना आणखी धक्का बसला. आता असं या व्हिडीओत नेमकं काय आहे ते तुम्हीच पाहा. हे वाचा - OMG! सरपटणारा सापही चालू लागला; विश्वास बसत नाही तर पाहा हा VIDEO व्हिडीओत पाहू शकता एका सापाच्या तोंडात दुसरा साप आहे. सापाचं निम्मं शरीर त्या सापाच्या तोंडात गेलं आहे. नंतर साप त्या सापाला आपल्या तोंडातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. हळूहळू करून तो सापाला पूर्णपणे ओकून बाहेर काढतो. आश्चर्य म्हणजे जसा तो साप त्या सापाच्या तोंडातून बाहेर येतो तसा तो साप हलताना दिसतो. म्हणजे सापाने जिवंत गिळल्यानंतरही हा साप जिवंत आहे. OdishaTV च्या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. चॅनेलने दिलेल्या माहितीनुसार ही घटना ओडिशाच्या बांकीतील आहे. हे वाचा - OMG! सापाने चक्क स्वतःलाच जिवंत गिळलं; कधीच पाहिला नसेल असा SHOCKING VIDEO यातील सापाला गिळणारा साप हा किंग कोब्रा आहे. जो जगातील सर्वात विषारी आणि खतरनाक सांपापैकी एक आहे. तज्ज्ञांच्या मते, यांच्या विषापासून वाचणं खूप कठिण असतं. एका सापाने दुसऱ्या सापाची शिकार केल्याचं पाहताच त्यांना सोडवायचं कसं हे तिथल्या नागरिकांनाही समजेना ते घाबरले आणि त्यांनी वनविभाग आणि रेस्क्यू टिमला कळवलं. पण टिम तिथं येण्याआधीच सापाने सापाला सोडून दिलं.
First published:

Tags: King cobra, Snake, Viral, Viral videos

पुढील बातम्या