वॉशिंग्टन, 17 ऑगस्ट : साप म्हणजे सरपटणारा प्राणी. त्याला पाय नसतात त्यामुळे तो चालू शकत नाही. हे आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे चालणारा साप असं म्हटलं तर त्यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. पण सध्या सोशल मीडियावर अशाच चालणाऱ्या सापाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या चालणाऱ्या सापाला पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. सापाला पाय असते तर, सापही चालू लागला तर, सापाला पाय का नसतात असे प्रश्न कदाचित तुम्हाला कधी ना कधी पडले असतील किंवा आता तुमची लहान मुलंही तुम्हाला विचार असतील. पण लॉस एंजेल्समध्ये राहणारा एलेन पॅन नावाच्या युट्यूबरला सापांना पाय नसल्याचं वाईट वाटत होतं. त्यामुळे त्याने सापांना पाय असते तर किंवा साप चालू लागला तर असा फक्त विचारच केला नाही तर त्याने सापांना पाय देण्याचा प्रयत्न केला. त्याने सापांना चालतं करून दाखवलं. त्याच्यामुळेच सापांना पाय फुटले असं म्हणायला हरकत नाही. आता एलनने असं नेमकं काय केलं हे पाहण्याची उत्सुकता तुम्हाला असेल. हे वाचा - शत्रूचा खात्मा करायला जाताना जवानाच्या मार्गात अचानक आला खतरनाक किंग कोब्रा; पुढे काय घडलं तुम्हीच पाहा VIDEO एलनने आपल्या युट्यूब चॅनेलवर चालणाऱ्या सापाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता त्याने असं डिव्हाइस तयार केलं ज्यामुळे साप चालू लागले. त्याने एक लांब अशी पलॅस्टिक ट्युब घेतली. ज्याला पुढे दोन आणि मागे दोन असे एकून चार प्लॅस्टिकचे पाय जोडले. याला लॅपटॉपवर एका प्रोग्राममार्फत व्हायरलेस पद्थतीने अॅक्टिव्हेट केलं.
त्यानंतर सापांना पाळणारे अँथोनो जावालाजवळ तो गेला आणि त्याने आपलं डिव्हाइस टेस्ट करण्यासाठी दिलं. त्यांनी सापाला ट्युबच्या आत टाकलं आणि काय कमाल साप चक्क चालू लागला. सापाचे हे स्वतःचे पाय नसतील, त्याचं त्याच्यावर नियंत्रण नाही पण तरी साप स्वतःच चालतो आहे असं वाटतं. सापाला रोबोटिक पायांनी चालताना पाहून त्यांना जितका उत्साह वाटला तितकाच आपल्यालाही वाटतो. हे वाचा - निसर्गाचा अद्भुत चमत्कार! आकाशात वाहू लागला ढगांचा धबधबा; कधीच पाहिला नसेल असा VIDEO एलनचा हा आविष्कार सर्वांनाच आवडला आहे. व्हिडीओ पाहून यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. त्याचं बहुतेकांनी कौतुक केलं आहे. हा चालणारा साप पाहून तुम्हाला काय वाटलं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.