जाहिरात
मराठी बातम्या / Viral / विषारी King Cobra ला तलावाबाहेर काढण्यासाठी पाण्यात उतरला तरुण; काय झाला शेवट पाहा VIDEO

विषारी King Cobra ला तलावाबाहेर काढण्यासाठी पाण्यात उतरला तरुण; काय झाला शेवट पाहा VIDEO

तलावातून कोब्रा सापाचं रेस्क्यू.

तलावातून कोब्रा सापाचं रेस्क्यू.

किंग कोब्रा सापाला तलावातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

मुंबई, 18 ऑक्टोबर :  किंग कोब्रा जगातील सर्वात खतरनाक आणि विषारी सापां पैकी एक. हा साप चावल्यानंतर काही मिनिटांतच संबंधित व्यक्तीचा मृत्यू होतो. अशाच सापाला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी एका व्यक्तीने स्वतःच्या जीवाची बाजी लावली. सापाच्या रेस्क्यूचा हा संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. व्हिडीओ पाहूनच अंगावर अक्षरशः काटा येईल. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती एक व्यक्ती किंग तलावाजवळ जाते. ती त्या तलावात उतरते. या तलावात खतरनाक किंग कोब्रा आहे. त्याला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी ही व्यक्ती पाण्यात जाते. किंग कोब्राला काठीत धरून उचलण्याचा प्रयत्न करते. त्याचवेळी कोब्रा त्या व्यक्तीवर हल्ला करतो. ज्यावेळी व्यक्ती सापाला पकडायला जाते. तेव्हा तितक्या वेळा साप हल्ला करतो. ही व्यक्ती तलावात पडतेसुद्धा. हे वाचा -  धक्कादायक! दारूड्याला चावताच सर्वात विषारी King Cobra चाही मृत्यू; पाहा Shocking video बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर अखेर ही व्यक्ती सापाला पकडतेच. सापाला काठीवर अलगद धरून ती वर येताना दिसते. व्हिडीओच्या शेवटी ती साप हातात धरून दाखवते. फणा काढून हा साप त्या व्यक्तीच्या हातावर बसला आहे.

News18लोकमत
News18लोकमत

सुरुवातीला अगदी लहान दिसणारा हा साप जवळून पाहिल्यानंतर किती मोठा आहे ते समजतं. त्याला पाहूनच आपल्याला धडकी भरते. अखेर या सापाला जंगलात सोडून दिल्याची माहिती आहे.

जाहिरात

@animal_lover_snake_shivu इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं, ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा. किती खतरनाक आहे किंग कोब्रा? सापाच्या विषानुसार साप किती खतरनाक हे ठरतं. सापांमध्ये 5 प्रकारचे विष सापडतात. त्यापैकी न्यूरोटॉक्सिन विष सर्वात घातक असतं. माणसांच्या नर्व्हस सिस्टमवर या विषाचा परिणाम होतो. कोब्रा सापात हेच न्यूरोटॉक्सिन विष असतं. कोब्राच्या दंशानंतर माणसांचं हृदय, फुप्फुस काम करणं बंद होतो आणि मृत्यू होतो. कोब्रा सापातही 300 प्रकारच्या प्रजातीचे साप असतात. साप चावल्यानंतर काय करायचं? WHO च्या मते जगभरात दरवर्षी साप चावण्याच्या जवळपास 50 लाख घटना घडतात. दरवर्षी जवळपास 81 हजार ते 1 लाख 38 हजार लोकांचा मृत्यू सर्पदंशाने होतो. हे वाचा -  सिंधुदुर्गच्या रस्त्यावर आली मगर, कॅमेऱ्यात टिपण्यासाठी नागरिक थांबताच…; थरकाप उडवणारा VIDEO साप दोन पद्धतीने दंश करतात. एक ड्राय बाइट, ज्यात ते फक्त चावतात आणि दुसरा विषारी दंश ज्यात ते डसून विषही सोडतात. पण कोणताही साप डसला तरी तात्काळ उपचार करण्याचा सल्ला दिला जातो. कारण कोणता साप चावला, त्याचं विष किती खतरनाक हे आपल्याला माहिती नसतं. त्या व्यक्तीला लगेच अ‍ॅन्टीवेनोम द्यायला हवं. कोणत्या सापाने दंश केला हे समजलं तर उपचार करणं सोपं होतं. पण हे थोडं कठीणच आहे. डॉक्टरकडे पोहोचेपर्यंत जिथे साप चावला तिथे घट्ट बांधा जेणेकरून सापाचं विष शरीरात पसरणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात