नवी दिल्ली, 6 मार्च : प्राण्यांची मस्करी करणे अनेकवेळा महागात पडते. असेही प्राणी आहेत ज्यांना पाहिल्यावरच अंगावर काटा येतो त्यांच्याशी मस्करी किंवा त्यांच्या जवळ जाणंही धोकादायक असतं. मात्र बरेच लोक प्राण्यांना मुद्दामून त्रास देण्याचा प्रयत्न करतात. काहीतरी विचित्र करुन त्यांचं लक्ष वेधतात आणि नंतर त्यांना त्रास देतात. अशा लोकांच्या वाईट कृत्याचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. सध्य्या समोर आलेला व्हिडीओ किंग कोब्राचा असून एका व्यक्तीने त्याला मुद्दामू उचकावलं असल्याचं यामध्ये पहायला मिळालं. हा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्कीच शॉक व्हाल आणि अंगावर काटा आल्याशिवायही राहणार नाही. हेही वाचा - फ्रेंच फ्राईज टू फिट गाईज; दिवसातून 3 वेळा बर्गर खाऊन कुस्तीपटूने वजन केलं कमी व्हिडीओमध्ये दिसत आहे की, ट्रक रस्त्यावरून जात आहे, मात्र त्यानंतर ड्रायव्हरने किंग कोब्राला छेडले आणि किंग कोब्राने वेळ न गमावता लगेचच हल्ला करण्यासाठी धाव घेतली. ट्रक ड्रायव्हर घाबरला आणि त्याने ताबडतोब आपली गाडी पळवण्यास सुरुवात केली. सोबत ही घटनादेखील कॅमेऱ्याच कैद करण्यात आली.
अवघ्या काही सेकंदांच्या व्हिडिओने लोकांना आश्चर्याचा धक्का दिला. किंग कोब्राचा वेग पाहून काही वेळासाठी वाटलं की आता गाडीला टेक ओव्हर करेल. मात्र ट्रक चालक भरधाव वेगाने आपल्या गाडीमधून पळून गेला. therealtarzann नावाच्या युजरने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. आतापर्यंत त्याला 86 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे, तर लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या.
दरम्यान, साप, कोब्रा या भयानक प्राण्यांना पाहणेही अवघड जाते तोच दुसरीकडे असेही लोक आहेत जे त्यांच्यासोबत पंगा घेतात. मग काय त्यांचीच चांगली फजिती झालेली पहायला मिळते. साप आणि कोब्राचे आत्तापर्यंत अनेक व्हिडीओ समोर आले आहेत ज्यामध्ये त्यांना कोणतरी छेडछाड करतं तर दुसरीकडे ते लोकांवर हल्ला करतात.

)







