लंडन, 05 एप्रिल : ब्रिटनचे नवे सम्राट चार्ल्स तिसरा यांचा राज्याभिषेक 6 मे रोजी होणार आहे. लंडनच्या ऐतिहासिक शाही कॅथेड्रल वेस्टमिन्स्टर अॅबेमध्ये हा विशेष कार्यक्रम होणार आहे. यामध्ये जगातील सर्व देशांचे प्रमुख, धार्मिक नेते आणि सेलिब्रिटींचा समावेश असेल. गेल्या अनेक महिन्यांपासून राज्याभिषेकाची तयारी सुरू आहे. पण या राज्याभिषेक सोहळ्याआधी एक बेडूक चर्चेत आला आहे. किंग चार्ल्स यांच्या राज्याभिषेकादरम्यान एक बेडूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. हा एक खास बेडूक आहे ज्याचा ब्रिटीश राजघराण्याशी खास संबंध असल्याचं सांगितलं जातं आहे. या बेडकाचं किंग चार्ल्स यांच्याशी खास नातं आहे. तपकिरी रंगाचा हा बेडूक इतर बेडकांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. त्याच्या संपूर्ण शरीरावर केशरी रंगाचे मोठे ठिपके आहेत. Real Tom & Jerry Video : इवलासा उंदीर मांजरावर भारी; पाहा रिअल ‘टॉम अँड जेरी’ची जबरदस्त फाइट हा बेडूक 2008 मध्ये इक्वेडोरमध्ये सापडला होता. इक्वेडोरचे शास्त्रज्ञ डॉ. लुईस ए. कोलोमा यांनी याचा शोध लावला. जेव्हा ते प्रजातींचे जतन करणाऱ्या संग्रहालयाची तपासणी करत होते, तेव्हा त्यांना हा अनोखा बेडूक सापडला. त्यानंतर त्यांनी बेडकांच्या अनेक प्रजाती शोधून काढल्या. ब्रिटीश रॉयल फॅमिलीच्या अधिकृत वेबसाइटनुसार, झाडावर आढळणाऱ्या दुर्मिळ प्रजातीचा हा बेडूक आहे. याचं नाव हायओसर्टस प्रिंसचार्लेसी आहे. याला प्रिन्स चार्ल्स मॅग्निफिसेंट ट्री फ्रॉग असंही म्हणतात. बापरे बाप! घरात घुसला असा दुर्मिळ साप, मालकाची हवा टाईट; PHOTO पाहूनच डोळे पांढरे होतील आपल्या ठिकाणांचं संरक्षण करण्यात हा बेडूक खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. प्रिन्स चार्ल्स हेसुद्धा पर्यावरण बचावाच्या मोहिमांना पाठिंबा देतात. म्हणून त्यांच्या सन्मानार्थ या बेडकाचं नाव त्यांच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.