मुंबई, 3 सप्टेंबर : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ हे मनाला भावुक करतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गणेशाच्या चरणी, सोबतीने अनेकांची विघ्न दूर होतात. असा हा गणेशा मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांनाच हवाहवासा वाटतो. त्याचा विसर्जनाचा दिवस कधीच येऊ नये असंच वाटत असता. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत कळू शकलेलं नाही. मात्र हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून मोठ्या संख्येने पाहिला जात आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुरडा आपल्या वडिलांना बाप्पाचं विसर्जन करण्यापासून रोखत आहे. त्या आपलं अख्खं बळ लावून बाप्पाची मूर्ती आपल्याजवळ घेण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी तो रडतोय..आरडा ओरडा करतोय..मात्र बाप्पा आपल्याला सोडून जाऊ नये ही त्याची निर्मळ भावना आहे.
शेवटी त्याची आई मध्यस्थी करते. मात्र तो चिमुरडा कोणाचंही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही. बाप्पाची मूर्ती त्याच्याजवळून घेतल्यानंतर तो रडू लागतो. असा हा व्हिडीओ तुम्हाला भावुक करेल. गणेश ऑफिशियल पार्गी नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. Ganesh Visarjan : 10व्या दिवशीच का केले जाते गणपतीचे विसर्जन? महाभारताशी निगडित आहे कारण, वाचा माहिती ‘गणपती बाप्पा मोरया’ या जयघोषामागची कथा बाप्पाला त्यांच्या आवडीचा प्रसाद अर्पण करतो. बाप्पाची आरती करतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपण गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करतो. मात्र तुम्हाला ‘गणपती बाप्पा मोरया’ या जयघोषामागची कथा माहित आहे का? गणपती बाप्पाशी संबंधित मोरया या शब्दामागे गणपतीचे मयूरेश्वर रूप असल्याचे मानले जाते. गणेश पुराणानुसार सिंधू नावाच्या राक्षसाच्या अत्याचाराला सर्व लोक कंटाळले होते. तो खूप शक्तिशाली होता आणि देवी-देवता, सर्व मानव त्याच्या अत्याचारामधून सुटण्याचा मार्ग शोधत होते.