नवी दिल्ली, 03 जून : सोशल मीडियावर निरनिराळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. रोज काहीतरी नवीन सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असतं. त्यामुळे नेटकरीही जास्तीत जास्त वेळ सोशल मीडियावर व्यतीत करत असतात. अनेक मजेशीर, विचित्र, धोकादायक, भयानक, भावुक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये फाईटिंग दरम्यान खेळाडूचा पाय वाकडा झाल्याचं पहायला मिळालं. हा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल होताच एकच खळबळ उडालेली पहायला मिळत आहे. MMA म्हणजे मिक्स्ड मार्शल आर्ट्स. हा एक अनोखा खेळ आहे. ज्यामध्ये बॉक्सिंग, मार्शल आर्ट्स आणि कुस्तीचे डावपेच एकत्र वापरले जातात. यात स्पर्धा आहेत ज्यात दोन्ही खेळाडू रिंगच्या आत या तीन वेगवेगळ्या पद्धतींचे प्रदर्शन करून एकमेकांना पराभूत करण्याचा प्रयत्न करतात. पण हा खेळ खूप धोकादायक आहे कारण त्यात लढण्याची पद्धत बॉक्सिंग, मार्शल आर्ट्स आणि कुस्तीपेक्षा वेगळी आणि घातक आहे. अलीकडे एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक खेळाडू MMA फाईटमध्ये गंभीर जखमी झाला.
व्हिडिओमध्ये, दोन खेळाडू रिंगच्या आत एकमेकांना भिडताना दिसत आहेत. एक खेळाडू दुसऱ्याच्या पायाला लाथ मारतो पण तो स्वतः खाली पडतो. व्यक्तीच्या पायाचे हाड तुटते आणि त्याच्या पायाचे बोट झाडाच्या फांदीसारखे एका बाजूला लटकते. हे दृश्य पाहूनच अंगावर काटा उभा राहतो. खेळाडूला वेदना होत असतील पण तो चेहऱ्यावर दाखवत नाही पण खूप घाबरलेलाही वाटत आहे.
खेळाडूची अशी अवस्था पाहून लगेचच मेडिकल टीमला बोलावण्यात येते. खेळाडूचा पाय पाहून तु्म्हीही घाबरुन जाल. @mmafight_universe नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडीओवर अनेक कमेंटही येताना दिसत आहेत.