मराठी बातम्या /बातम्या /Viral /Kiara Advani Fan: बापरे! कियारा अडवाणीचं कौतुक करणं पतीला पडलं महागात, पत्नीने काय केलं एकदा पाहाच, VIDEO

Kiara Advani Fan: बापरे! कियारा अडवाणीचं कौतुक करणं पतीला पडलं महागात, पत्नीने काय केलं एकदा पाहाच, VIDEO

कियारा अडवाणी

कियारा अडवाणी

Kiara Advani Fan: बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी आपल्या लग्न सोहळ्यामुळे सध्या सर्वांत जास्त चर्चेत आहेत. कियारानं 7 फेब्रुवारी रोजी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राशी लग्न केलं. त्यामुळे दोघांचेही चाहते आनंदी आहेत. मात्र, कियारामुळे एका पती-पत्नीचा वाद झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

पुढे वाचा ...
 • Trending Desk
 • Last Updated :
 • Maharashtra, India

  मुंबई, 8 फेब्रुवारी- बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी आपल्या लग्न सोहळ्यामुळे सध्या सर्वांत जास्त चर्चेत आहेत. कियारानं 7 फेब्रुवारी रोजी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राशी लग्न केलं. त्यामुळे दोघांचेही चाहते आनंदी आहेत. मात्र, कियारामुळे एका पती-पत्नीचा वाद झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरवर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जो पाहिल्यानंतर अनेक पतींना वाटेल की त्यांच्यासोबतही असं कधीना कधी घडलेलं आहे. या व्हिडिओतील व्यक्ती आपल्या पत्नीची तुलना अभिनेत्री कियारा अडवाणीशी करतो. यानंतर, पत्नीची प्रतिक्रिया बघून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

  हा व्हिडिओ परवीन (@PraveenSarraf_) नावाच्या ट्विटर अकाउंटवरून 1 फेब्रुवारी रोजी पोस्ट केला गेला होता. 'जेव्हा पती आपल्या पत्नीची तुलना कियारा अडवाणीशी करतो!' अशा कॅप्शनसह हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे. 51 सेकंदांच्या या व्हिडिओत नवरा-बायकोचा संवाद दाखवण्यात आला आहे. "नवरा म्हणतो की, अरे यार, ती अभिनेत्री आहे! तुला का राग येतोय? तू अशी रिअ‍ॅ क्ट करत आहेस जसं मी तिच्याशी लग्न करेन?" नवऱ्याच्या म्हणण्याला बायको त्याच्याकडे न बघताच उत्तर देते.

  (हे वाचा:Sidharth-Kiara Wedding:तुम्ही पाहिली का सिद्धार्थ-कियाराची लग्नपत्रिका? समोर आली वेडिंग कार्डची हटके डिझाईन )

  ती म्हणते, "जा कर तिच्याशी लग्न". बायकोच्या या उत्तरावर नवरा म्हणतो - जणू ती माझ्याशी लग्न करेल! यावर बायको उपहासाने म्हणते - करेल ना ती, तू खूप चांगला आहेस ना, सगळ्या मुली तुझ्या प्रेमात पडतील... मग नवरा पुन्हा बायकोला विचारतो, म्हणजे मला कुठली अभिनेत्री आवडू शकत नाही का? यानंतर बायको त्याला म्हणते, तू कियारा अडवाणीकडेच जा, तुला जेवायला मिळणार नाही!

  ही बातमी लिहेपर्यंत या व्हिडिओला 46 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि दोनशेहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. यावर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरनं कमेंट केली आहे, "भाऊ, ती एक स्त्री आहे, ती काहीही करू शकते." दुसर्‍यानं लिहिलं आहे, "वहिनी अगदी बरोबर बोलत आहेत. तू का केली त्यांची तुलना? वहिनी, पुढचे सात दिवस त्याला जेवण देऊ नका." आणखी एका युजरनं कमेंट केली आहे की, "असं वाटलं की, मी आणि माझी पत्नीच बोलत आहोत."

  व्हॉट्सअ‍ॅप आणि सोशल मीडियावर पती-पत्नीबद्दल भरपूर जोक्स उपलब्ध आहेत. बहुतेक जोक्समध्ये नवरा बिचारा दाखवला जातो. इन्स्टाग्रामवर याचे अनेक रीलही बघायला मिळतात.

  First published:

  Tags: Entertainment, Kiara advani, Video viral