बॉलिवूडच्या क्युट कपल्सपैकी एक सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी नुकतंच लग्नगाठ बांधली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची चर्चा सुरु होती. या दोघांनी कधीही अधिकृतपणे आपल्या लग्नाची घोषणा केलेली नव्हती. परंतु या दोघांनी कधी या बातम्यांना नकारही दिला नव्हता. दरम्यान या दोघांनी जैसलमेरमध्ये लग्नगाठ बांधली आहे. नुकतंच या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये सिड-कियाराच्या वेडिंग लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कियाराने आपल्या लग्नात खास कलिरे घातले होते. याचं वैशिष्ट्य असं की यामध्ये सिद्धार्थ मल्होत्राचा पेट डॉग ऑस्करचा चेहरा बवण्यात आला होता. ऑस्करचा गेल्यावर्षी मृत्यू झाला होता. शिवाय यामध्ये कियारा आणि सिडच्या नावाचं पहिलं अक्षर आणि चांदण्या दिसून येत आहेत. सिद्धार्थ आणि कियाराची ही केमिस्ट्री प्रेक्षकांना फारच पसंत पडत आहे.