अचानक समोर आलेली स्वत:बद्दलची बातमी वाचताना न्यूज अँकर झाली नि:शब्द, व्हिडीओ VIRAL

अचानक समोर आलेली स्वत:बद्दलची बातमी वाचताना न्यूज अँकर झाली नि:शब्द, व्हिडीओ VIRAL

न्यूज चॅनेलमधील अँकर नेहमीच्या ब्रेकिंग बातम्या वाचताना कधी थकत नाही किंवा अडखळत नाहीत. मात्र सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यामध्ये बातमी वाचता वाचता एक न्यूज अँकर नि:शब्द झाली.

  • Share this:

तिरुवनंतपुरम, 14 फेब्रुवारी : न्यूज चॅनेलमधील अँकर नेहमीच्या ब्रेकिंग बातम्या वाचताना कधी थकत नाही किंवा अडखळत नाहीत. मात्र सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यामध्ये बातमी वाचता वाचता एक न्यूज अँकर नि:शब्द झाली. घटनाही तशीच होती कारण राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या पुरस्कारांबाबची बातमी ही अँकर वाचत होती. ही बातमी वाचतानाच त्यांच्या लक्षात आलं की राज्य सरकारकडून देण्यात येणारा ‘बेस्ट न्यूज अँकर’चा पुरस्कारावर त्यांच्याच नावाची मोहोर लागली आहे.

केरळमधील 'मातृभूमी' या न्यूज चॅनेलमध्ये ही घटना घडली. श्रीजा श्याम या न्यूज अँकर आणि चीफ सब-एडिटर म्हणून मातृभूमी न्यूज चॅनेलमध्ये काम पाहतात. बुधवारी सकाळचं बुलेटीन वाचत असताना त्यांच्यासमोर केरळ सरकारने जाहीर केलेल्या पुरस्कारांची बातमी आली. त्यामध्ये त्यांचं नाव ‘बेस्ट न्यूज अँकर’ म्हणून घोषित करण्यात आलं. आपलं नाव वाचताच थोड्या वेळासाठी श्रीजा थबकल्या, मात्र त्यांनी काहीशा आनंदातच पुढील बातमी वाचून दाखवली. श्रीजा यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होता. अशी बातमी आल्याने न्यूज डेस्कवरील तिचे सहकारी देखील खूश झाले होते. त्यांच्यामध्ये हशा पिकल्याने Live Broadcast मध्ये श्रीजा यांना हसू आलं. 'या बातमीनंतर आपल्याला खूप आनंद झालाय' अशी प्रतिक्रिया श्रीजा यांनी दिली आहे.

फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 14, 2020 08:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading