गाय (Cow) ही सर्वार्थाने उपयुक्त प्राणी मानली जाते. आरोग्याच्या दृष्टीनं गायीचं दूध, तूप तसंच अन्य दुग्धजन्य पदार्थ हितावह मानले जातात. गायीच्या दुधातली पोषणमूल्यं लहान मुलांसाठी अधिक फायदेशीर ठरतात. तसंच सर्व वयोगटातल्या व्यक्तींनी रोज गायीचं दूध प्यावं असं सांगितलं जातं. गायीचं दूध (Cow Milk) जितकं हितावह असतं, तितकंच गोमूत्र (Cow Urine) आणि गोबर अर्थात शेणदेखील (Cow Dung) उपयुक्त असतं. अर्थातच ते देशी गायीचं असणं अपेक्षित असतं. गोमूत्राचा वापर अनेक कारणांसाठी केला जातो. शेणापासून गोवऱ्या, उदबत्ती, धूप आदी दैनंदिन गरजेच्या वस्तू तयार केल्या जातात. काही जण आरोग्यासाठी दररोज गोमूत्र प्राशन करतात. ही बाब काही नवीन नाही. परंतु सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ खूप व्हायरल होतोय. त्यात एक डॉक्टर चक्क गोबर अर्थात शेणाचं सेवन करताना दिसत आहेत. हे डॉक्टर गेल्या अनेक वर्षांपासून गोमूत्र आणि शेणाचं सेवन करत आहेत. याविषयीचं वृत्त 'आज तक'ने दिलं आहे.
मनोज मित्तल असं या डॉक्टरांचं नाव असून, ते कर्नाल (Karnal) येथे राहतात. मनोज मित्तल हे एमबीबीएस डॉक्टर असून, बालरोगतज्ज्ञ (Pediatrician) आहेत. त्यांचं कर्नालमध्ये मोठं हॉस्पिटल आहे. डॉ. मनोज मित्तल हे दररोज गोमूत्र आणि गोबर सेवन करतात. आरोग्याच्या (Health) दृष्टीने या दोन्ही गोष्टी खूप फायदेशीर आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. गोबर सेवन करतानाचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) खूप व्हायरल (Viral) होत आहे. त्यांच्या त्या व्हिडीओवर नेटीझन्सही भरपूर प्रतिक्रिया देत आहेत. यात काही युझर्स डॉ. मनोज मित्तल यांच्या पदवीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसत आहेत. काही युझर्स डॉ. मनोज मित्तल यांच्या मताशी सहमती दर्शवताना दिसत आहेत. सर्वसाधारणपणे एमबीबीएस डॉक्टर्सना आयुर्वेदात सांगितलेल्या गोष्टी पटत नाहीत किंवा त्यांचा अवलंब ते करत नाहीत. हे डॉक्टर मात्र त्याला अपवाद आहेत.
हेही वाचा : जीवावर उदार होऊन प्रवाशाला वाचवलं, पॉईंट्समनच्या धाडसाचा देशाला अभिमान; बघा VIDEO
याबाबत बोलताना डॉ. मनोज मित्तल यांनी सांगितलं, की "गोबर अर्थात शेणामध्ये व्हिटॅमिन बी 12 (Vitamin B12) मुबलक प्रमाणात असतं. यामुळे रेडिएशनपासून (Radiation) संरक्षण होतं. मोबईल, एसी, फ्रीज आदी वस्तूंमधून मोठ्या प्रमाणात रेडिएशन होतं. यामुळे कर्करोगासारखे गंभीर आजार होऊ शकतात. परंतु, शेणाच्या सेवनामुळं रेडिएशनचा प्रभाव कमी होतो. गर्भवती महिलेनं शेणापासून तयार केलेला रस सेवन केला तर प्रसूती नॉर्मल होण्याची शक्यता वाढते. तसंच गायीच्या शेणामुळे अनेक आजार बरे होतात".
Dr. Manoj Mittal MBBS MD's prescription. Via @ColdCigar pic.twitter.com/SW2oz5ao0v https://t.co/Gzww80KiSs
— Rofl Gandhi 2.0 🚜🏹 (@RoflGandhi_) November 16, 2021
हेही वाचा : दिराच्या लग्नात वैनीचा भन्नाट डान्स, पाहा जबरदस्त VIDEO
"गायीच्या शेणात 28 टक्के ऑक्सिजन असतो. यामुळे आरोग्य संतुलित राहतं. चांगल्या आरोग्यासाठी मी दररोज गोबर सेवन करतो", असा दावा डॉ. मनोज मित्तल यांनी केला आहे. "मी दररोज फरशीवर झोपतो. तसंच मी आजपर्यंत कधीही एसी किंवा पंख्याचा वापर केलेला नाही", असंही त्यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral video.