जाहिरात
मराठी बातम्या / Viral / हळदी समारंभात नाचताना महिलेनं पाणी समजून फेकली अ‍ॅसिडची बाटली अन्.. पुढं घडलं भयानक कांड

हळदी समारंभात नाचताना महिलेनं पाणी समजून फेकली अ‍ॅसिडची बाटली अन्.. पुढं घडलं भयानक कांड

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एक अनोखा प्रकार समोर आला आहे.

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एक अनोखा प्रकार समोर आला आहे.

Kanpur: उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एक अनोखा प्रकार समोर आला आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    कानपूर, 26 नोव्हेंबर : कानपूरमध्ये एका लग्नाच्या हळदी समारंभात धक्कादायक प्रकार घडला आहे. एक महिला अ‍ॅसिडची बाटली घेऊन या हळदी समारंभात नाचत होती. नाचताना या महिलेने तिच्याकडची बाटली फेकली व त्यातलं अ‍ॅसिड दोन मुलींवर पडलं. यामुळे दोन्ही मुलींचे चेहरे गंभीररीत्या भाजले आहेत. गुरुवारी (24 नोव्हेंबर 2022) ही घटना घडली; मात्र हे प्रकरण शुक्रवारी (25 नोव्हेंबर 2022) समोर आलं असून, या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. घटनेमध्ये जखमी झालेल्या दोन्ही मुलींना नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केलं आहे. दरम्यान, संबंधित महिलेने चुकून पाण्याची बाटली समजून अ‍ॅसिडची बाटली उचलली असल्याचं सांगण्यात येत आहे. याबाबत पोलिसांनी सांगितलं, की, ‘घटनेची माहिती मिळताच जुही पोलीस ठाण्याचे पोलीस तपासासाठी घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणी अद्याप कोणीही तक्रार दिलेली नाही. कोणी तक्रार केली, तर गुन्हा नोंदवला जाईल, प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी केली जाईल. सध्या अ‍ॅसिडमुळे भाजलेल्या दोन्ही मुलींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.’ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘परमपुरवामधले रहिवासी अतिख खान यांची मुलगी सलमा हिचा हळदीचा समारंभ होता. त्या वेळी अनीश खानची पत्नी रुबीना ‘नशा शराब में होता’ गाण्यावर डान्स करत होती. डान्स करताना रुबीनाने तिथे ठेवलेली अ‍ॅसिडची बाटली पाणी समजून उचलली व ती स्वतःच्या डोक्यावर ठेवली. डान्स करताना रुबीनानं तिच्याकडे असलेली बाटली अचानक फेकली. या बाटलीचं झाकण सैल असल्यामुळे ती उघडली व त्यामधलं अ‍ॅसिड रुबीनापासून जवळच बसलेल्या दोन मुलींच्या चेहऱ्यावर उडालं. त्यामुळे या दोघींचा चेहला भाजला. दरम्यान, ही टॉयलेट क्लीनर अ‍ॅसिडची बाटली असल्यामुळे त्वचेचं फारसं नुकसान झालेलं नाही, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.’ वाचा - होमवर्क केला नाही म्हणून शिक्षकाचे विद्यार्थ्यासोबत धक्कादायक कृत्य! घटनेनंतर कुटुंबीयांनी सर्वप्रथम दोन्ही जखमी मुलींना उपचारासाठी मेडिकल कॉलेजमध्ये नेले. यानंतर त्यांना गुरू तेगबहादूर नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आलं. नर्सिंग होमच्या डॉक्टरांनी सांगितलं की, ‘एका मुलीच्या डोळ्यात अ‍ॅसिड गेलं आहे. तिची प्रकृती गंभीर आहे. प्लास्टिक सर्जन आणि नेत्ररोगतज्ज्ञांनी तिची तपासणी केली असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत.’ दुसरीकडे, या घटनेनंतर कुटुंबामध्ये जोरदार भांडण झालं आहे. ही अ‍ॅसिडची बाटली कट रचून फेकल्याचा आरोप काहींनी केला आहे. हे कृत्य जाणूनबुजून केल्याचं काही जणांचं मत आहे. या धक्कादायक प्रकाराने कानपूर हादरलं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: kanpur , wedding
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात