मराठी बातम्या /बातम्या /देश /

होमवर्क केला नाही म्हणून शिक्षकाचे विद्यार्थ्यासोबत धक्कादायक कृत्य!

होमवर्क केला नाही म्हणून शिक्षकाचे विद्यार्थ्यासोबत धक्कादायक कृत्य!

विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण वाढू नये म्हणून अनेक शाळा त्यांना गृहपाठ देत नाहीत. हसत-खेळत शिक्षण देण्यावर सध्या मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे.

विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण वाढू नये म्हणून अनेक शाळा त्यांना गृहपाठ देत नाहीत. हसत-खेळत शिक्षण देण्यावर सध्या मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे.

विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण वाढू नये म्हणून अनेक शाळा त्यांना गृहपाठ देत नाहीत. हसत-खेळत शिक्षण देण्यावर सध्या मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर : विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण वाढू नये म्हणून अनेक शाळा त्यांना गृहपाठ देत नाहीत. हसत-खेळत शिक्षण देण्यावर सध्या मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. पण उतर प्रदेशातील कानपूरच्या शाळेत मात्र होमवर्क पूर्ण न करणाऱ्या तिसरीच्या विद्यार्थ्याला शिक्षकाकडून बेदम मारहाण करण्यात आली. एवढ्यावरच न थांबता त्यानं विद्यार्थ्याचे केस उपटून हातात दिले व आई-वडिलांना जाऊन केस दाखव, असा दम भरला. जाब विचारण्यासाठी शाळेत गेलेल्या पालकांनाही शिवीगाळ करण्यात आल्याचा प्रकार घडला. या प्रकरणात शाळा व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘टीव्ही 9 हिंदी’नं या संदर्भात वृत्त दिलं आहे.

शिक्षक-विद्यार्थ्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना 5 नोव्हेंबर 22 रोजी कानपूरच्या पनकी रतनपूर येथील पंचमुखी विद्यालयात घडली. पवन ढाका असं विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या शिक्षकाचं नाव आहे. मुलाला मारहाण झाली म्हणून त्याचे पालक शाळेत जाब विचारण्यासाठी गेले होते. त्यावेळी शाळेचे व्यवस्थापक अरुण कटिहार यांनी पालकांना शिवीगाळ करून धमकी दिली. अरुण कटिहार आणि शिक्षकाविरुद्ध कारवाई व्हावी म्हणून दलित समाजातील पालक असलेली महिला पनकी ठाण्यात पोहोचली. परंतु महिलेचं म्हणणं ऐकून घेऊन कठोर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी कलम 151 नुसार थातूर-मातूर कारवाई केल्याचा आरोप पालकांनी केला.

हेही वाचा -  Shraddha murder case Update : श्रद्धाचे तुकडे फ्रीजमध्ये अन् आफताब दुसऱ्याच मुलीसोबत राहत होता घरात

मारहाणीमुळे भेदरला विद्यार्थी

अजय गौतम हे पत्नी व मुलगा आरवसोबत डूडा कॉलनीत राहतात. आरव हा तिसऱ्या वर्गात शिकतो. होमवर्क न केल्यानं शिक्षकाने त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळे तो खूप भेदरला आहे. या प्रकरणानंतर आरवच्या कुटुंबीयांना शाळा व्यवस्थापनाकडून सतत धमकी दिली जात आहे. विद्यार्थ्याला मारहाण झाल्याचं हे प्रकरण पोलीस आयुक्तांपर्यंत पोहोचलं. त्यामुळे आरवच्या आईनं पोलीस आयुक्त बी. पी. जोगदंड यांच्याकडे तक्रार दिली असून, न्याय देण्याची मागणी केली आहे. प्रकरणाचे गांभीर्य पाहता पोलीस अधिकाऱ्यांनी पूर्ण प्रकरण समजून घेऊन स्थानिक पोलिसांना अनुसूचित जाती-जमाती संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरवच्या आई-वडिलांनी समाधान व्यक्त केलं.

शिक्षण विभागाकडून अद्याप कारवाई नाही

विद्यार्थ्याला मारहाण झाल्याच्या प्रकरणात पूर्ण तपास करून दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचं अधिकारी सांगत आहेत. शाळा व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, या प्रकरणानंतर शिक्षण विभाग किंवा विभागातील अधिकाऱ्याने कारवाई करण्यासाठी पावलं उचलली नाहीत. याचा तपासही सुरू केलेला नाही. एकीकडे शासनाकडून शिक्षण व्यवस्थेत बदल करण्यासंदर्भात सांगितलं जात आहे. परंतु, दुसरीकडे खासगी शाळांमध्ये असे मारहाणीचे प्रकार घडत असल्याने पालकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण आहे.

First published:

Tags: Kanpur, School teacher, Uttar pardesh