नवी दिल्ली, 20 जुलै : पृथ्वीवर अनेक रहस्यमयी गोष्टी आहेत. ज्याच्याविषयी शास्त्रज्ज्ञांचाही शोध सुरु आहे. अनेक गूढ, रहस्य समोर येत असतात. आत्तापर्यंत अनेक थक्क करणारी, आश्चर्यकारक रहस्य समोर आली आहे. काहींचे तर फोटो व्हिडीओदेखील समोर आले आहेत. अशातच आणखी एक रहस्यमयी गोष्ट समोर आली असून याचा व्हिडीओ इंटरनेट व्हायरल होत आहे. समुद्राच्या आत अनेक रहस्य दडलेली असतात. यातीलच एक रहस्य समोर आलं आहे. समुद्रात एक रहस्यमयी मासा आढळून आला आहे. हा मासा पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, समुद्राच्या पाण्यात एक अनोखा मासा आढळला. असा मासा पहिला कधीच दिसला नाही. मोठे डोळे असलेल्या या माशाच्या शरीरावर एक मोठे छिद्र आहे, जे सहसा माशांमध्ये दिसत नाही. ते पाहून अनेकजण अवाक् झाले. हा एक दुर्मिळ सागरी प्राणी असल्याचं दिसून येत आहे. हा दुर्मिळ सागरी मासा तैवानजवळ दिसला. अतिशय चकचकीत आणि दिसायला मोठा असलेल्या या माशाची लांबी सुमारे 32 फूट आहे. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, या अनोख्या माशाचे नाव डूम्सडे फिश आहे. तैवानमधील रुईफांगमध्ये समुद्रात ते सरळ तरंगताना दिसला. शार्कचा हल्ला टाळताना त्याच्या शरीरात एक जखम तयार झाली होती जी छिद्रासारखी दिसते. हे प्राणी अनेकदा समुद्राच्या पृष्ठभागाखाली 656-3200 फूट खोलवर आढळतात.
Off Taiwan's coast, divers found a "Doomsday fish" — a giant Herring king associated with earthquake predictions. Its size and shape resembling a sea serpent, locals consider it an ominous sign in Japanese mythology pic.twitter.com/ipZXG8v6XO
— Tansu Yegen (@TansuYegen) July 17, 2023
दरम्यान, यापूर्वीही समुद्रात निरनिराळे प्राणी आढळले आहेत. कधीही पाहिलं नाही असे मासे समोर आले आहेत. त्यामुळे समुद्री दुनियेत असे अनेक रहस्यमयी जीव आहेत.