जाहिरात
मराठी बातम्या / Viral / बसल्यावर पाय हलवणे हे शुभ की अशुभ? ज्योतिषशास्त्र काय सांगतं?

बसल्यावर पाय हलवणे हे शुभ की अशुभ? ज्योतिषशास्त्र काय सांगतं?

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

बसताना किंवा झोपताना पाय हलवणे ही केवळ चुकीची सवय नाही तर तिचा ज्योतिषशास्त्राशी खूप खोल संबंध आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : प्रत्येक माणसाच्या चांगल्या वाईट सवयी असतातच. यासवयी कधी माणसाठी चांगल्या ठरतात, तर कधी लोकांना अडचणीत आणतात. अशीच एक सवय म्हणजे बसल्या बसल्या पाय हलवण्याची. अनेकांना अशी सवय असते की ते बसल्या बसल्या सतत पाय हलवत असतात. लोकांना हे सामान्य वाटते पण ज्योतिषशास्त्रानुसार हे सामान्य नाही तर अशुभ आहे. पाय हलवण्याचा थेट संबंध तुमच्या आरोग्य आणि संपत्तीशी आहे. जाणून घेऊया त्याचे तोटे. तुमच्या फ्रीजमधूनही आवाज येतो, मग ही धोक्याची घंटा? बसताना किंवा झोपताना पाय हलवणे ही केवळ चुकीची सवय नाही तर तिचा ज्योतिषशास्त्राशी खूप खोल संबंध आहे. शास्त्रानुसार उंच ठिकाणी जसे खाट, खुर्ची, पलंग इत्यादींवर बसून किंवा झोपताना पाय हलवल्याने कुंडलीत चंद्र कमजोर होतो. अशा स्थितीत चंद्राच्या अशुभ प्रभावामुळे व्यक्तीला मानसिक तणावातून जावे लागते. चंद्राच्या अशुभ प्रभावामुळे व्यक्तीला कोणत्याही कामात शांती मिळत नाही, तो येणाऱ्या काळात आरोग्य किंवा आर्थिक संकटाने त्रस्त असतो. पैशांचा खर्च वाढू लागतो. बसताना पाय हलवल्याने लक्ष्मीची नाराजी होते. असे मानले जाते की घरातील आशीर्वाद दूर होतात आणि गरिबी निवास करू लागते. अनेकदा तुम्ही लोकांना असं बोलताना ऐकलं असेल की जेवताना पाय हलवू नये, पण असं का? या मागचं कारण कोणालाही माहिती नसतं. पण जेवताना पाय हलवणं म्हणजे अन्नपूर्णाचा अनादर करणं आणि अन्नपूर्णेचा अपमान म्हणजे माता लक्ष्मीचा अपमान होतो. परिणामी संपूर्ण कुटुंबाला पैसा आणि धान्याचा फटका सहन करावा लागतो.

News18लोकमत
News18लोकमत

पूजेला बसल्यावर पाय हलवल्याने उपासना आणि उपवास निष्फळ होतात, असे म्हणतात. कारण ही सवय माणसाची मानसिक क्षमता कमी करते. अशा परिस्थितीत, व्यक्ती कोणत्याही बाबतीत निर्णय घेऊ शकत नाही. अगदी विज्ञानातही पाय हलवणे ही आरोग्यासाठी वाईट सवय मानली जाते. वैद्यकशास्त्रात पाय हलवण्याच्या सवयीचे वर्णन रेस्टलेस लेग्स सिंड्रोम असे केले आहे आणि हा एक गंभीर आजार आहे. या आजारामुळे हृदय, किडनी, पार्किन्सन्सशी संबंधित समस्या वाढतात. तुम्हाला जर अशी सवय असेल तर सावध व्हा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात