मराठी बातम्या /बातम्या /Viral /So cute! रस्ता ओलांडताना हत्तीने केला 'गोड इशारा'; VIDEO ने वेधलं सर्वांचं लक्ष

So cute! रस्ता ओलांडताना हत्तीने केला 'गोड इशारा'; VIDEO ने वेधलं सर्वांचं लक्ष

या हत्तीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

या हत्तीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

या हत्तीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

मुंबई, 24 डिसेंबर : हत्ती (Elephants Video) जरी शरीराने अवाढव्य असला तरी तो तितकाच तो क्युट वाटतो कारण तो इतर प्राण्यांच्या तुलनेत बराच शांत असतो. त्यामुळे हत्तींचे सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओही आपण आवडीने पाहतो. असाच एका व्हिडीओने सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. ज्यात रस्ता ओलांडताना एका हत्तीने रस्ता ओलांडू देणाऱ्या एका व्यक्तीचे अनोख्या पद्धतीने आभार मानले आहेत (Elephants thanks Video) .

आभार मानणाऱ्या या गजराजाने सर्वांचं मन जिंकल आहे. या हत्तीला पाहून तुमच्याही तोंडून सो क्युट असंच निघेल.  व्हिडीओत पाहू शकता, रस्त्याच्या एका बाजूने काही हत्ती येताना दिसत आहेत. एकेएक करत बरेच हत्ती रस्त्याच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला पळत सुटतात. ते रस्ता ओलांडत असतात. हत्तींना रस्ता ओलांडताना पाहून गाडीचालकांनी आपल्या गाड्या थांबवल्या आहेत.

अखेर सर्व हत्ती रस्त्याच्या ओलांडतात. त्यावेळी शेवटचा एक हत्ती रस्त्याच्या किनाऱ्यावर थोडा थांबतो. गाड्यांकडे पाहतो आणि आपली सोंड वर करतो. आपल्यासाठी गाडी थांबणाऱ्यांचे तो आभार मानताना दिसतो. हत्ती अनोख्या पद्धतीने आभार व्यक्त करतो.

हे वाचा - अरेच्चा हा तर हॅरी पॉटर! तरुणाच्या हातातच जादू; Magic video पाहून थक्क व्हाल

@TheFigen नावच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला हे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. हा हत्ती आणि त्याची आभार मानण्याची हटके स्टाईल सर्वांनाच आवडली आहे.

First published:

Tags: Elephant, Viral, Viral videos, Wild animal