जाहिरात
मराठी बातम्या / Viral / 6 महिन्यांच्या बाळाने गिळला प्लास्टिकचा बल्ब; डॉक्टर उपचार करताना सर्वांना फुटला घाम, पाहा VIDEO

6 महिन्यांच्या बाळाने गिळला प्लास्टिकचा बल्ब; डॉक्टर उपचार करताना सर्वांना फुटला घाम, पाहा VIDEO

6 महिन्यांच्या बाळाने गिळला प्लास्टिकचा बल्ब; डॉक्टर उपचार करताना सर्वांना फुटला घाम, पाहा VIDEO

बल्ब बाळाच्या घशात अडकला होता. डॉक्टरांकडून अथक प्रयत्न केले जात होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

झारखंड, 28 ऑक्टोबर : कधी कधी आपली छोटी चूक किंवा दुर्लक्ष मोठा धोका निर्माण करू शकते. अशीच एक घटना पलामू जिल्ह्यातील हुसेनाबाद स्थित घोडबंधा गावात घडली आहे. येथे एका 6 महिन्यांच्या बाळाने प्लास्टिकचा बल्प गिळण्याचा प्रयत्न केला, यामुळे तिच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. (Jharkhand news Plastic bulb swallowed by 6 month old baby) मिळालेल्या माहितीनुसार, घोडबंधा निवासी सतेंद्र राम यांची सहा महिन्यांची मुलगी प्रिया कुमारीने खेळत असताना तब्बल दोन इंच प्लास्टिकचा बल्ब चुकून गिलला. जो तिच्या गळ्यात जाऊन अडकला. गळ्यात प्लास्टिकचा बल्प अडकल्यामुळे मुलीला खूप त्रास होऊ लागला. यानंतर तातडीने कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केलं. कुटुंबीयांकडून डॉक्टरांचे धन्यवाद करण्यात आले. हे ही वाचा- भयंकर! YouTube Video पाहून 17 वर्षांच्या मुलीने घरातच केली स्वत:ची डिलिव्हरी कुटुंबीयांनी सांगितलं की, मुलीने खेळता खेळता प्लास्टिकचा बल्ब तोंडात घेतला आणि तो तोंडात घातला. बल्ब तिच्या गळ्यात अडकल्यानंतर ती जोरजोरात रडू लागली. सुरुवातील कुटुंबीय स्वत:च मुलीच्या तोंडात अडकलेला बल्ब काढण्याचा प्रयत्न करीत होते, मात्र कोणालाही ते जमलं नाही. मुलीच्या जीवाला धोका असल्याचं पाहत त्यांनी मुलीला रुग्णालयात दाखल केलं. येथे डॉक्टरांच्या टीमने अथक प्रयत्न करून मुलीच्या घशात अडकलेला बल्ब काढला. आता मुलगी धोक्याच्या बाहेर आहे. जेव्हा डॉक्टरांनी मुलीच्या तोंडातून प्लास्टिकचा बल्ब काढला तेव्हा पाहणाऱ्यांनाही आश्चर्य वाटलं. अनेकदा आपण केलेलं दुर्लक्ष लहान मुलांच्या जीवावर बेतू शकतं. त्यामुळे लहान मुलांच्या जवळपास किंवा त्यांचा हात जाईल अशा ठिकाणी कोणत्याही धोकादायक वस्तू ठेवू नये. त्याशिवाय बाळाच्या हालचालीकडेही नियमित लक्ष देणं गरजेचं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात