जाहिरात
मराठी बातम्या / Viral / अमेरिकन सेलिब्रिटी झाला ‘जलेबी-बाबा’, गाता गाता तळतोय जिलब्या; पाहा Viral Video

अमेरिकन सेलिब्रिटी झाला ‘जलेबी-बाबा’, गाता गाता तळतोय जिलब्या; पाहा Viral Video

अमेरिकन सेलिब्रिटी झाला ‘जलेबी-बाबा’, गाता गाता तळतोय जिलब्या; पाहा Viral Video

अमेरिकी गायक आणि गीतकार जेसन डेरुलोनं जिलेब्या करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ऑनलाईन विश्वात हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

असं म्हणतात, की जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही राहत असला, तरी भारतीय पदार्थ (Indian Food) कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुमच्या आयुष्यात येतातच. भारतीय पदार्थांचं वैविध्य आणि चव यांची जादू जगातील प्रत्येक कोपऱ्यापर्यंत पोहोचते आणि ते पदार्थ चाखण्याचा मोह भल्याभल्यांना आवरत नाही. आता हे पदार्थ खाण्यासाठी भारतात येणं प्रत्येकालाच जमेल असं नाही. पण त्या पदार्थांची रेसिपी समजून घेऊन अनेकजण घरातच तो पदार्थ तयार करतात. अमेरिकीतील लोकप्रिय गायक आणि गीतकार जेसन डेरूलोनं (Jason Derulo) नुकतीच आपली जिलब्या खाण्याची हौस भागवून घेतली. हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल (Viral) होत आहे.

जाहिरात

शेअर केला व्हिडिओ जेसन डेरुलोनं जिलब्या तयार करण्याची रेसिपी आणि स्वतः जिलब्या तळत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ऑनलाईन विश्वात हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. एखाद्या सराईत शेफप्रमाणं जेसन जिलब्या तयार करताना या व्हिडिओत दिसत आहे. व्हिडिओ पाहताना ‘जलेबी बेबी’ हे गाणंही बॅकग्राऊंडमध्ये ऐकू येतं. आनंद लुटत तळल्या जिलब्या जिलेब्यांसाठीच्या पूर्वतयारीपासून ती तळण्यापर्यंत आणि नंतर तळलेल्या जिलब्या पाकात घालण्यापर्यंत प्रत्येक काम जेसन हा अगदी मनापासून आणि त्याचा पूर्ण आनंद घेत करत असल्याचं व्हिडिओत दिसतं. वेगवेगळ्या क्षेत्रात यश संपादन केलेल्या व्यक्ती या कुठलंही काम करताना त्या कामात कशा प्रकारे पूर्णतः तल्लीन होतात, हे आपण अनेकदा पाहतो. मग ते कलेच्या सादरीकरणाचं काम असो, घरकाम असो किंवा या व्हिडिओत जेसन करत असलेलं जिलब्या करण्याचं काम असो. जिलब्या तळण्याच्या पूर्वतयारीपासून त्या पाकातून काढण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट जेसन एन्जॉय करताना या व्हिडिओत दिसतं. हे वाचा - टेबलावर 2 काचेच्या बाटल्या, त्यावर पाय ठेवून महिलेचा योगा; पुढे घडलं असं की… या व्हिडिओचा कॅप्शनही त्यानं भन्नाट टाकलाय. तुमच्यापैकी ज्यांना जिलेबी म्हणजे काय, हा प्रश्न पडलाय, त्या प्रत्येकासाठी… असं मजेशीर कॅप्शन जेसननं दिलं आहे. जेसनची ही रेसिपी बघून तोंडाला पाणी सुटलं नाही, तरच नवल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात