जाहिरात
मराठी बातम्या / Viral / दर तीन वर्षांनी घटस्फोट आणि पुन्हा एकमेकांशीच लग्न, जोडप्याचं असं करण्यामागे कारण काय?

दर तीन वर्षांनी घटस्फोट आणि पुन्हा एकमेकांशीच लग्न, जोडप्याचं असं करण्यामागे कारण काय?

दर तीन वर्षांनी घटस्फोट आणि पुन्हा एकमेकांशीच लग्न, जोडप्याचं असं करण्यामागे कारण काय?

या जोडप्यानं 2016 मध्ये पहिल्यांदा लग्न केलं होतं. त्यानंतर दोघांनीही पतीचं आडनाव लावलं. यानंतर 2019 मध्ये त्यांनी एकमेकांना घटस्फोट दिला आणि पुन्हा एकमेकांशी लग्न केलं. यानंतर त्यांनी पत्नीचं आडनाव लावलं. यावर्षी जुलैमध्ये पुन्हा त्यांचा घटस्फोट होणार आहे.

    मुंबई, 2 एप्रिल : लग्न करणं ते निभावणं काही सोपी गोष्ट नाही. असं तुम्ही अनेकदा लोकांकडून ऐकलं असेल. लग्नानंतर अनेक जबाबदाऱ्या येतात, परंतु आपण हे नातं निभावण्याची पूर्णपणे प्रयत्न करत असतो. मात्र एका जपानी जोडप्यानं (Japanese couple) लग्नानंतर असं काही केलं की, ते ऐकल्यावर तुम्हालाही त्यांचं कृत्य अत्यंत बालिश वाटेल. झालं असं की, एका जपानी जोडप्याने लग्न तर केलं मात्र त्यांना आपापलं आडनाव बदलायचं नव्हतं. यासाठी त्यांनी एक विचित्र मार्ग निवडला. ऑडिटी सेंट्रल वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, टोकियोजवळ (Tokyo) एक हाचियोजी (Hachioji city, Japan) नावाचं शहर आहे. तिथं हे तरुण जोडपं राहतं. त्यांनी काही महिने एकमेकांना डेट केलं आणि नंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र लग्नाआधी दोघांचं आडनावावरून भांडण झालं. पतीचं म्हणणं होतं की, पत्नी लग्नानंतर पतीचं कौटुंबिक आडनाव दत्तक घेते. मात्र पत्नी आपले आडनाव बदलण्यास तयार नव्हती. दोघांनीही आपल्या मित्रांशी याबाबत चर्चा केली मात्र त्यांना काही उपाय सापडला नाही. मग या जोडप्याला अशीच समस्या असलेल्या दुसऱ्या एका जोडप्याबद्दल कळलं आणि त्यांनीही या जोडप्याप्राणेच थोड्याथोड्या काळासाठी एकमेकांचं आडनाव वापरण्याचा निर्णय घेतला. आता हे जोडपं आलटूनपालटून एकमेकांचं आडनाव लावतं आणि यासाठी त्यांनी दर तीन वर्षांनी एकमेकांना घटस्फोट (divorce after every 3 years) देऊन पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. Husband-Wife Relation: पती-पत्नीनं एकाच ताटात जेवण केल्यास होतात `हे` दुष्परिणाम या जोडप्यानं 2016 मध्ये पहिल्यांदा लग्न केलं होतं. त्यानंतर दोघांनीही पतीचं आडनाव लावलं. यानंतर 2019 मध्ये त्यांनी एकमेकांना घटस्फोट दिला आणि पुन्हा एकमेकांशी लग्न केलं. यानंतर त्यांनी पत्नीचं आडनाव लावलं. यावर्षी जुलैमध्ये पुन्हा त्यांचा घटस्फोट होणार आहे आणि त्यानंतर ते पुढील तीन वर्ष पतीचं आडनाव वापरणार आहेत. या समस्येवर उपाय म्हणून या जोडप्याकडे आणखी एक मार्ग उपलबध होता. ते म्हणजे जिथं पती पत्नीला आपापलं आडनाव लावण्याची मोकळीक मिळेल अशा देशात जाऊन लग्न करणं. त्यानंतर जपानला येऊन आपल्या लग्नाला मान्यता मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज करणं. जपानच्या कायद्यानुसार लग्नानंतर पती-पत्नीला एकच आडनाव लावणं बंधनकारक आहे. Hindu New Year 2022 Horoscope: हिंदू नववर्ष या तीन राशींना ठरेल विशेष फलदायी; बाकीच्या राशींबद्दलही घ्या जाणून जोडप्याने अवलंब केलेल्या या मार्गाचा त्यांना कधीकधी खूप त्रासही होतो. कारण त्यांना आपलं आडनाव बदलण्यासाठी दर तीन वर्षांनी पेपर वर्क करावं लागतं. दोघांनीही आपापल्या ऑफिसात आपली मूळ नावं नोंदवलेली आहेत. मात्र इतर ठिकाणी जिथं अधिकृत कागदपत्रे हवी असतात. तिथं त्यांना दर तीन वर्षांनी एकमेकांचं आडनाव लावावं लागतं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात