जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Husband-Wife Relation: पती-पत्नीनं एकाच ताटात जेवण केल्यास होतात `हे` दुष्परिणाम

Husband-Wife Relation: पती-पत्नीनं एकाच ताटात जेवण केल्यास होतात `हे` दुष्परिणाम

Husband-Wife Relation: पती-पत्नीनं एकाच ताटात जेवण केल्यास होतात `हे` दुष्परिणाम

पती-पत्नीनं एकाच ताटात जेवण करणं टाळावं. ते परस्पर प्रेमाच्या दृष्टिकोनातून असं करत असले तरी हे पूर्णतः चुकीचं असल्याचं धर्मशास्त्राचे जाणकार सांगतात.

    मुंबई, 2 एप्रिल : सहवास आणि प्रेमातून नातं (Relation) खुलतं, असं म्हणतात. अर्थात याला पती-पत्नीचं नातंदेखील (Husband-Wife Relation) अपवाद नाही. पती-पत्नीचं नातं कसं असावं, याविषयीचे उल्लेख अगदी पौराणिक ग्रंथांमध्येही (Mythological Texts) आढळतात. अलीकडच्या काळात या नात्यातही खूप बदल झाल्याचं पाहायला मिळतं. कुटुंबातील सदस्यांची संख्या मर्यादित असल्याचं दिसून येतं. त्याचा परिणाम नातेसंबंधांवर झाला आहे. पूर्वी एकत्र कुटुंब (Joint family) पद्धती होती. त्यामुळे कुटुंबात सदस्य संख्या जास्त असे. या सर्व सदस्यांची जबाबदारी कर्त्या पुरुषावर होती. पण आता हे चित्र पूर्णपणे बदललं आहे. अर्थात यामुळे कुटुंबातील काही संकल्पनाही बदलल्याचं दिसून येतं. बहुतांश घरांमध्ये प्रेमाखातर पती आणि पत्नी एकाच ताटात जेवण करतात. एकाच ताटात जेवण केल्यानं प्रेम वाढतं, असं ते मानतात. पण घरातल्या ज्येष्ठ सदस्य आणि धर्मशास्त्र जाणकारांच्या मते असं करणं चुकीचं आहे. अर्थात यामागे काही कारणं सांगितली गेली आहे. महाभारतात (Mahabharata) याविषयी उल्लेख आढळतो. महाभारतात भीष्म पितामह (Bhishma Pitamah) यांनी यावर भाष्य केलं आहे. ` झी न्यूज हिंदी `ने याबाबतची माहिती दिली आहे. पती-पत्नीनं एकाच ताटात जेवण करणं टाळावं. ते परस्पर प्रेमाच्या दृष्टिकोनातून असं करत असले तरी हे पूर्णतः चुकीचं असल्याचं धर्मशास्त्राचे जाणकार सांगतात. महाभारतात भीष्म पितामह यांनी यावर भाष्य केल्याचे उल्लेख आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून भोजनाचा आस्वाद घ्यावा. यामुळे कुटुंबातील (Family) व्यक्तींविषयी प्रेम वाढतं. तसंच यामुळे एकमेकांप्रती त्याग आणि समर्पणाची भावना प्रबळ होते आणि त्यामुळे कुटुंबाची प्रगती होते. Hindu New Year 2022 Horoscope: हिंदू नववर्ष या तीन राशींना ठरेल विशेष फलदायी; बाकीच्या राशींबद्दलही घ्या जाणून एकत्र जेवण केल्यानं प्रेम वाढतं हे नाकारता येणार नाही. ही गोष्ट भीष्म पितामह यांनादेखील माहिती होती. प्रत्येक माणसाची कुटुंबाप्रती अनेक कर्तव्ये आहेत. अशा परिस्थितीत जर ती कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडायची असतील आणि कुटुंबातील संबंध सौहार्दपूर्ण ठेवायचे असतील तर पती-पत्नीनं एकाच ताटात जेवण करू नये, असं त्यांनी म्हटलं आहे. खरं तर पत्नीसोबत एकाच ताटात जेवण केल्यानं कुटुंबातील इतर नातेसंबंधांच्या तुलनेत पत्नीचं प्रेम हे नवऱ्यासाठी सर्वश्रेष्ठ ठरतं. यामुळे संबंधित व्यक्तीची बुद्धी भ्रष्ट होते आणि तो योग्य आणि अयोग्य यातील फरक विसरतो. जर पतीचं पत्नीवरील प्रेम सर्वश्रेष्ठ ठरलं तर कुटुंबात कलहाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे पती- पत्नीनं एकाच ताटात जेवण करू नये, असं भीष्म पितामह यांनी म्हटलं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात