Home /News /viral /

इटलीच्या प्रिन्सला गर्लफ्रेंडनं म्हटलं कंजूष, इतके कोटी उधळूनही कोर्टात पोहोचलं प्रकरण

इटलीच्या प्रिन्सला गर्लफ्रेंडनं म्हटलं कंजूष, इतके कोटी उधळूनही कोर्टात पोहोचलं प्रकरण

एखादा बॉयफ्रेंड त्याच्या गर्लफ्रेंडवर मोठ्या प्रमाणात खर्च करत असेल, तर तिने किमान आपलं थोडं तरी कौतुक करावं अशी त्याची अपेक्षा असते. इटलीचा एक राजकुमार (Italy Prince) मात्र या बाबतीत अगदीच कमनशिबी ठरला आहे.

     मुंबई, 13  जानेवारी-   एखादा बॉयफ्रेंड त्याच्या गर्लफ्रेंडवर मोठ्या प्रमाणात खर्च करत असेल, तर तिने किमान आपलं थोडं तरी कौतुक करावं अशी त्याची अपेक्षा असते. इटलीचा एक राजकुमार   (Italy Prince)   मात्र या बाबतीत अगदीच कमनशिबी ठरला आहे. कारण लाखो रुपयांच्या भेटवस्तू देऊनही या राजकुमाराच्या गर्लफ्रेंडने त्याला चक्क कंजूष   (Italian Prince branded stingy by girlfriend) म्हटलं. दरम्यान, हे प्रकरण आता कोर्टात गेलं असून, गर्लफ्रेंडनेही या प्रिन्सवर वेगवेगळे आरोप केले आहेत. ‘मिरर’च्या वृत्तानुसार या 51 वर्षीय राजकुमाराचं   (Italian stingy prince)   नाव जियाकोमो बोनानो डि लिंगुआग्लोसा असं आहे. 2019 मध्ये बेलारूस देशातल्या 35 वर्षीय तान्या यशेंकोची आणि प्रिन्सची ओळख झाली. यानंतर या दोघांमध्ये अफेअर सुरू झालं. ती दोघं दुबई, माँटे कार्लो, मालदीव अशा विविध ठिकाणी एकत्र फिरली. दुसऱ्या एका वृत्तपत्रातल्या माहितीनुसार, या प्रिन्सने तान्याला 69 लाख रुपयांहून अधिक किमतीची मर्सिडीज गाडी (Mercedes car), 48 लाख रुपयांहून अधिक किमतीच्या भेटवस्तू, तसंच तान्याच्या रोममधील फ्लॅटच्या भाड्यासाठी 15 लाख रुपयेदेखील (Italian prince gave lavish gifts to girlfriend) दिले होते; मात्र तरीही ती वारंवार प्रिन्सला घालून पाडून बोलत असे आणि त्याला कंजूष (Prince called as stingy) म्हणत असे. दरम्यान, या तरुणीनेही गेल्या वर्षी प्रिन्सविरोधात तक्रार दाखल केली होती. यामध्ये प्रिन्स आपल्या मागे लागला असल्याचं तिनं म्हटलं होतं. यामुळे आपल्याला मानसोपचारतज्ज्ञांकडे उपचार घ्यावे लागले असल्याचंही तिने आपल्या तक्रारीत सांगितलं होतं. प्रिन्सच्या वकिलांनी हे आरोप फेटाळून, तान्या कशा प्रकारे प्रिन्सचा फायदा घेते आहे हे कोर्टात दाखवून दिलं होतं. तान्याचे असे कित्येक मेसेज (Italian prince girlfriend messages) समोर आले आहेत, ज्यामध्ये ती प्रिन्सला काहीही बोलत आहे. “तू इटलीमधली आपली अर्धी गुंतवणूक माझ्या नावावर करू शकत होतास; मात्र तू कंजूष आहेस म्हणून तसं केलं नाहीस,” हा त्यातला एक मेसेज माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाला आहे. (हे वाचा:गर्लफ्रेंडच्या लग्नात जाण्यासाठी खटाटोप; साडी नेसून महिलेप्रमाणे नटला पण..,VIDEO ) दरम्यान, प्रिन्सने गेल्या आठवड्यात आपल्या फेसबुक अकाउंटवरून पोस्ट करून तान्याची माफी (Italian prince apologises to girlfriend) मागितली होती. “तान्यावर खोटे आरोप केल्याबदद्ल मी तिची माफी मागतो. मी तिला दिलेली गिफ्टदेखील मला परत नको आहेत.” मात्र प्रिन्सचे वकील अरमांडो फरजोला यांनी सांगितलं, की त्यांनी तान्यावरचा खटला अद्याप मागे घेतला नाही. “प्रिन्सचा स्वभाव अतिशय प्रेमळ आहे. तसंच त्यांचं तिच्यावर प्रेम आहे. त्यामुळे त्यांनी माफी मागितली आहे; मात्र आम्ही त्यांना तिच्यापासून वाचवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या आमचं तेच उद्दिष्ट आहे. बाकी पैसे परत घेणं हा नंतरचा प्रश्न आहे.” दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप होत असल्यामुळे अद्याप या प्रकरणात नेमकं खरं कोण हे कळण्यास मार्ग नाही; मात्र तान्याचे मेसेजेस खरे असतील, तर सुमारे दीड कोटींच्या भेटवस्तू घेऊनही आपल्या बॉयफ्रेंडला कंजूष म्हणणाऱ्या गर्लफ्रेंडपासून दूर राहण्यातच प्रिन्सचं हित आहे असं दिसतंय.
    First published:

    Tags: Social media viral

    पुढील बातम्या