भररस्त्यात वृद्धानं काढली बैलाची खोड, पुढे काय झालं पाहा थरारक VIDEO

भररस्त्यात वृद्धानं काढली बैलाची खोड, पुढे काय झालं पाहा थरारक VIDEO

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून आतापर्यंत हा व्हिडीओ 43 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

  • Share this:

मुंबई, 10 ऑक्टोबर : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी प्राण्यांचे तर कधी प्राण्यांनी हल्ले केल्याचे व्हिडीओ सोशल व्हायरल होतात. एका माणसानं बैलाची खोडी काढली आणि रागाच्या भरात बैलानं त्याला चांगली अद्दल घडवल्याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओला सोशल मीडियावर तुफान पसंती मिळाली आहे. सहसा प्राणी माणसांवर विनाकारण हल्ला करत नाहीत पण माणसानंच खोडी काढली तर प्राणी देखील त्याला सोडत नाहीत हे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं.

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की बैल रस्त्याच्या कडेला शांतपणे उभा आहे आणि समोर येणाऱ्या वृद्ध व्यक्तीने हातातल्या दांडक्याने बैलाला मारायला सुरुवात केली. पहिल्या दोन वार पहिलानं झेलले मात्र तिसरा वार डोक्यावर बसला आणि बैलाचं मस्तक फिरलं आणि त्यानं थेट या वृद्धाला शिंगावर घेतलं.

हे वाचा-जुगाऱ्याने दिलेल्या लॉटरीमुळे भिकाऱ्यांच नशीब फळफळलं; आलिशान घराचं स्वप्न पूर्ण

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून आतापर्यंत हा व्हिडीओ 43 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर 25हून अधिक लोकांनी रिट्वीट केला आहे. तर अनेक युझर्सनी म्हताऱ्याला किडे जास्त असं ट्वीट करून कमेंट्स केल्या आहेत. शांत उभ्या असलेल्या बैलाची कळ काढल्यानं या बैलानं वृद्धाला चांगलाच धडा शिकवला. शिंगावर घेऊन जोरात अपटलं आणि परिसरात मोठी खळबळ उडाली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 10, 2020, 12:33 PM IST
Tags:

ताज्या बातम्या