मुंबई, 25 नोव्हेंबर : सोशल मीडियावर (social media) व्हायरल व्हिडीओ, फोटोसोबतचही (viral photo) काही चॅलेंज, पझल्स, गेम्सही ट्रेंड होत असतात. त्याकडेही नेटिझन्सना कल नेहमीच असतो (Social media challenge). सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे (Social media photo challenge). ज्यात एका महिलेचा चेहरा आहे (Woman face photo). फोटोतील महिलेचा चेहरा निम्मा आहे (Woman face illusion photo). पण हा फोटो असा आहे की ही महिला नेमकी कुठे पाहते आहे, तेच समजत नाही. आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो म्हणजे एक Illusion आहे. यामध्ये महिलेचा निम्मा चेहरा असा रेखाटण्यात आला आहे की ती समोरील आणि आपल्या बाजूलाही पाहताना दिसते. म्हणतात ना दिसतं तसं नसतं. तसंच या फोटोत जरी ही महिला दोन्ही बाजूला पाहत असताना दिसत असली, तरी वास्तवात मात्र ती एकाच बाजूला पाहते आहे आणि नेमकं तेच तुम्हाला ओळखायचं आहे.
या फोटोत दिलेल्या चॅलेंजनुसार ही महिला नेमकी समोर पाहते की बाजूला पाहते आहे, हेच तुम्हाला ओळखायचं आहे. फोटो पाहिल्यानंतर काही नेटिझन्सनी हे ओळखण्याचा प्रयत्न केला आहे. बघा तुम्हालाही जमतं का? आणि तुमचं उत्तर आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. हे वाचा - लय भारी! माकडाचं Hulla hooping; कमरेभोवती कशी गरागरा फिरवली रिंग पाहा VIDEO याआधी आयएफस अधिकारी परवीन कसवान यांनीही असाच एक फोटो शेअर केला होता. जो झेब्र्याचा फोटो होतो. हा फोटो पाहता क्षणीच भिरभिरी येते. पण हाच खरा टास्क आहे.
Let’s see who can tell which Zebra is in front. Clicked & asked by friend @saroshlodhi. pic.twitter.com/RNAMBJrk1K
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) July 8, 2020
या फोटोत नेमके किती झेब्रा आहेत त्यानंतर मग कोणता झेब्रा पुढे आहे, हे तुम्हाला ओळखायचं आहे. या फोटोवरही नेटिझन्सच्या बऱ्याच कमेंट आल्या. काही जण म्हणतात यामध्ये दोन झेब्रा आहेत, तरी काही जणांना वाटतं दोन नाही तर तीन झेब्रा आहेत. त्यानंतर प्रत्येक जण कोणता झेब्रा पुढे आहे, याबाबत तर्कवितर्क लढवत आहेत. हे वाचा - चीनमध्ये रंगतंय Wrist Challenge, लागलीय बारीक असण्याची स्पर्धा आता तुम्हीदेखील यात सहभागी व्हा. तुमच्याने हे कोडं सुटत नसेल तर मग तुमच्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक किंवा मित्रमैत्रिणींना ही बातमी पाठवा आणि त्यांना तुमची मदत करायला सांगा आणि तुम्हाला उत्तर मिळालं तर मग उत्तमच, तुम्ही इतरांना चॅलेंज द्या.