डब्लिन, 25 डिसेंबर : आयर्लंडच्या डब्लिनमध्ये एक दुर्घटना घडली या घटनेनं ज्याने सर्वांना चकित केले. प्राणीसंग्रहालयात आपल्या वडिलांसोबत फिरायला गेलेल्या एका चिमुकल्याचा थोडक्यात जीव वाचला. वाघासोबत फोटो काढताना अचानक त्यानं चिमुरड्यावर झडप घातली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये प्राणीसंग्रहालयात वाघा जवळच एक चिमुरडा फोटो काढत होता. 7 वर्षांचा चिमुरडा फोटो काढत असताना वाघ त्याच्यामागे उभा होता. वाघानं त्या मुलाकडे पाहिले आणि धावत येत त्याच्यावर झडप घातली. वाचा- करिना कपूरच्या Christmas पार्टीत आलिया-रणबीरची हटके एन्ट्री, पाहा Inside Photos फोटो काढताना मुलाने मागे वळून पाहताच वाघ शिकार करण्यासाठी पळाला. मात्र वाघ आणि मुलामध्ये आरसा असल्यामुळं मुलगा थोडक्यात वाचला. मुलाचे वडील रोब यांनी सुदैवाने आपल्या कॅमेर्यावर मोहक क्षण कैद केला. त्याने ट्विटरवर अपलोड केलेला हा व्हिडिओ क्षणार्धात व्हायरल झाला. वाचा- काश्मीरच्या हाडं गोठवणाऱ्या थंडीत जवानांनी साजरा केला ख्रिसमस, पाहा VIDEO
My son was on the menu in Dublin Zoo today #raar pic.twitter.com/stw2dHe93g
— RobC (@r0bc) December 22, 2019
वाचा- सुरक्षा काढल्यामुळे सचिनची मातोश्रीवर फिल्डिंग? आदित्य ठाकरे यांना Z सुरक्षा व्हिडिओ 23 डिसेंबर रोजी ट्विटरवर पोस्ट करण्यात आला होता, ज्याने आतापर्यंत 2 दशलक्ष लोकांमा पाहिला आहे. तसेच 46 हजार लाईक्स आणि 10 हजाराहून अधिक री-ट्वीट झाले आहेत. या व्हिडिओवर बर्याच लोकांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.