जाहिरात
मराठी बातम्या / Viral / एका साध्या फोटोत लपल्यात 8 वस्तू, त्यांना 10 सेकंदात शोधून काढण्याचं चॅलेंज तुम्ही स्वीकारणार?

एका साध्या फोटोत लपल्यात 8 वस्तू, त्यांना 10 सेकंदात शोधून काढण्याचं चॅलेंज तुम्ही स्वीकारणार?

एका साध्या फोटोत लपल्यात 8 वस्तू, त्यांना 10 सेकंदात शोधून काढण्याचं चॅलेंज तुम्ही स्वीकारणार?

मुंबई 14 सप्टेंबर : सोशल मीडियावर आपल्यासमोर नेहमीच वेगवेगळ्या गोष्टी येत असतात. त्यात व्हिडीओ, फोटो किंवा माहिती आपल्याला मिळते. सध्या सोशल मीडियावर ऑप्टीकल इल्यूजन संबंधीत अनेक फोटो व्हायरल होत आहेत. हे असे फोटो आपल्याला फार विचार करायला लावतात. तसेच आपल्या मेंदूला चालना देतात. जे लोकांना फार आवडतं. सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. जो लोकांना डोकं खाजवायला भाग पाडत आहे. कारण या फोटोमध्ये एक-दोन नाही तर चक्कं 8 वस्तू शोधायच्या आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 14 सप्टेंबर : सोशल मीडियावर आपल्यासमोर नेहमीच वेगवेगळ्या गोष्टी येत असतात. त्यात व्हिडीओ, फोटो किंवा माहिती आपल्याला मिळते. सध्या सोशल मीडियावर ऑप्टीकल इल्यूजन संबंधीत अनेक फोटो व्हायरल होत आहेत. हे असे फोटो आपल्याला फार विचार करायला लावतात. तसेच आपल्या मेंदूला चालना देतात. जे लोकांना फार आवडतं. सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. जो लोकांना डोकं खाजवायला भाग पाडत आहे. कारण या फोटोमध्ये एक-दोन नाही तर चक्कं 8 वस्तू शोधायच्या आहेत. हा ऑप्टीकल इल्यूजन फोटो ब्लॅक आणि व्हाईट रंगाचा आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीचा चेहरा दिसत आहे. तसेच त्याच्यामागे एक डोंगर देखील दिसत आहे. या फोटोमध्ये 8 वस्तू लापल्या आहेत आणि तुम्हाला अवघ्या 10 सेकंदात या फोटोमध्ये लपलेल्या 8 गोष्टी शोधून काढायच्या आहेत. जर तुम्ही यामध्ये लपलेल्या गोष्टी शोधून काढल्यात तर तुम्ही खूप हुशार आहात, असंच समजा. तुम्हाला या फोटोत लपलेल्या गोष्टी शोधण्यासाठी थोडं डोकं लावावं लागेल, तसं यामध्ये लपलेल्या वस्तू शोधून काढंणं तसं कठीण काम नाही. फक्त यासाठी तुम्हाला थोड्याशा एकाग्रतेची गरज आहे. पाहा फोटो

News18

आता तरी सापडल्या का यामध्ये लपलेल्या 8 वस्तू? जर तुम्हाला अजूनही वस्तू सापडल्या नाही तरी काळजी करु नका आम्ही तुम्हाला त्या कोणत्या 8 वस्तू आहेत याची हिंट देणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला त्या वस्तू शोधण्यासाठी मदत मिळेल. या फोटोमध्ये लपलीय छत्री, पंख, मेणबत्ती, मगर, पेर(फळ), बाटली, दिल आणि एक पुस्तक. आता चला लागा कामाला आणि या वस्तू कुठे लपल्यात? हे शोधून काढा. जर अजूनही तुम्हाला या फोटोमध्ये लपलेल्या 8 वस्तू सापडत नसतील तरी काळजी करुन नका, हा फोटो पाहा

News18

आता तुम्हाला या वस्तू सापडल्याच असतील? आता हा फोटो तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि पाहा त्यांना या फोटोमध्ये 8 वस्तू शोधता येतायत का?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात