नवी दिल्ली, 21 जुलै: अनेकदा वैवाहिक किंवा कौटुंबिक आयुष्यात (Family Life) अनेक गंमतीजमती घडत असतात. अशा गमतीजमती आता सोशल मीडियामुळे (Social Media) केवळ कुटुंबापुरत्या मर्यादित न राहता हजारो-लाखो लोकांपर्यंत पोहचतात आणि अशा गोष्टींचा आनंद सर्वजण घेताना आपण पाहतो. विशेष म्हणजे असे किस्से किंवा गंमतीजमती राजकारणी, सेलिब्रिटी किंवा अगदी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या खासगी आयुष्यातही घडतात. या गोष्टी जर त्यांनी सोशल मीडियावर शेअर केल्या तर व्यापक स्वरुपात त्या लोकांपर्यंत पोहोचतात आणि त्यावर लाइक्स, शेअर आणि कमेंटचा अक्षरशः पाऊस पडतो. हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे सध्या अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली आहे. ही पोस्ट कोणा सामान्य युजरची नसून एका बड्या पोलीस अधिकाऱ्याची (Police Officer) आहे. विशेष म्हणजे या पोस्टवर त्यांच्या पत्नीनं केलेली कमेंट हा सध्या नेटिझन्सच्या चर्चाचा विषय ठरला आहे. या पोस्टवर मजेदार कमेंटस आणि लाईक्सचा पाऊस पडला आहे. नेमकी काय आहे ही पोस्ट आणि त्यावर त्यांच्या पत्नीनं काय कमेंट केली आहे, पाहूया सविस्तर...
तामिळनाडूमधील आयपीएस अधिकारी संदिप मित्तल (IPS Officer Sandeep Mittal) यांनी त्यांच्या मनातली एक इच्छा नुकतीच ट्वीट (Tweet) केली. त्यांना जिलेबी (Jalebi) फार आवडते. या ट्वीटमध्ये त्यांनी मला लहानपणापासून जिलेबी फार आवडते. माझ्या लहानपणी 25 पैश्यांना एक मोठी जिलेबी मिळत होती. त्यावेळी मला वाटयचे की मी मोठा झाल्यावर खूप पैसे कमवेन आणि तीन - चार जिलेबी खरेदी करुन खाईन. मात्र आता माझी पत्नी मला जिलेबी खाऊ देत नाही, असं म्हटलं आहे. यावर त्यांच्या पत्नीनं `आज तुम्ही घरी या`, असं मार्मिक ट्वीट केलं आहे. त्याचं हे ट्वीट जोरदार व्हायरल झालं असून त्यावर लाईक्स (Likes) आणि मजेदार कमेंटचा (Comments) पाऊस पडला आहे.
आज आप घर आओ.... https://t.co/bBkz1CjoZi
— Office of Dr. Richa Mittal🇮🇳 (@drairicha) July 18, 2021
संदिप मित्तल यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या ट्वीटचा अनेक फॉलोअर्सनं चांगलाच आनंद घेतला. यावर कमेंट करताना एक युजर म्हणतो की सर, आज जिलेबी खातानाचा फोटो नक्की शेअर करा. दुसरा एक युजर या म्हणतो, की सर आज घरी जाल, तेव्हा तुम्हाला नक्की जिलेबी मिळणार.
बापरे! बापाकडून लेकीच्या सासरच्यांना तगडी भेट; एक टन मासे, 250 किलो मिठाई अन् 10 बकऱ्या
संदिप मित्तल यांच्या पत्नीचं हे ट्वीट देखील व्हायरल झाले. विशेष म्हणजे त्यावर आयएफएस अधिकारी मोहन चंद्र यांनी कमेंट केली. ते ट्वीटमध्ये म्हणतात, सकाळच्यावेळी 4 ते 5 किलोमीटर जॉगिंग करुन या म्हणजे वहिनी तुमचे जिलेबी देऊन स्वागत करतील. जिलेबीच्या या ट्वीटमुळे काही क्षणासाठी का होईना नेटिझन्सचे चांगलेच मनोरंजन झाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPS Officer, Viral post