मुंबई, 15 एप्रिल : कोणत्याही गाड्यांची चाकं ही गोलच असतात. गाड्यांची चाकं गोलच का असतात हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. गोल चाक गरागरा फिरतं आणि त्यामुळे गाड्या वेगाने धावतात. पण सध्या अशा सायकलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्याची चाकं गोल नाही तर चौकोनी आहेत. आता ही चौकोनी चाकांची सायकल चालणार तरी कशी? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. गोलऐवजी चौकोनी सायकल पाहिल्यानंतर कदाचित तुम्हीही डोक्यावर हात मारला असेल. ही सायकल काय कामाची, ती चालणार कशी असंच तुम्ही म्हणाल. या सायकलला पाहून प्रत्येकाला असंच वाटलं. पण जेव्हा या सायकलचा व्हिडीओ पाहिला तेव्हा मात्र सर्वजण चाट पडले. चौकोनी सायकल जशी चालायला लागली तसे सर्वजण चक्रावले.
चौकोनी सायकल चालणार कशी असा प्रश्न सर्वांना पडलेला असताना, विचित्र सायकल घेऊन रस्त्यावर आलेल्या या व्यक्तीने मात्र ही सायकल चालवून दाखवली आहे. त्यामुळे सर्वजण शॉक झाले आहेत. ओ तेरी! चपलेवर ठेवताच चार्ज झाला मोबाईल; फोन चार्जिंगच्या जबरदस्त जुगाडाचा VIDEO तुम्ही व्हिडीओ नीट पाहाल तर सायकलचं चाक पूर्ण फिरत नाही आहे. म्हणजे सामान्यपणे तुम्ही कोणत्याही गाडीचं चाक पाहिलं तर ते पूर्ण फिरतं, पण या सायकलचं चाक फिरत नाही तर त्यावरील फक्त रबरी टायर फिरताना दिसतो आहे आणि त्यामुळे ही सायकल पुढे जाते आहे. @Rainmaker1973 या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तसा या सायकलचा वेग सामान्य सायकलइतका नाही. पण तरी एक वेगळा प्रयोग म्हणून नक्कीच खास आहे. बहुतेकांना हा विचित्र प्रयोग आवडलेला नाही. याची काय गरज आहे, असा सवालही काही युझर्सनी केला आहे.
तुम्हाला ही सायकल कशी वाटली ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.